Rakhi Sawant: सतत मजेशीर काही ना काही करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे राखी सावंत. तिने काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे पण या चित्रपटांमधील तिच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला. नुकताच नृत्य दिग्दर्शिका फराह खानने राखीसोबत काम करतानाचा मजेशीर अनुभव सांगितला आहे. तो ऐकून सर्वांनाच हसू अनावर झाले आहेत.
बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतने 'मैं हूं ना' या चित्रपटात फराह खानसोबत काम केले. या चित्रपट अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री सुष्मिता सेन महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. २००४ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. फराह खानने कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांना दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, दार्जिलिंगमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू झाल्यानंतर दोन दिवसांनी राखी सावंत ‘मैं हूं ना’ च्या शूटिंगसाठी सहभागी झाली होती. त्यांनी आधी दुसऱ्या अभिनेत्रीला कास्ट केले होते पण तिच्या आईच्या फार मागण्या होत्या, त्यामुळे तिला चित्रपटातून काढून टाकण्यात आले.
वाचा: एल्विश यादवने युट्यूबर मॅक्सटर्नला केली बेदम मारहाण, पोलिसात तक्रार दाखल
“त्या अभिनेत्रीच्या आईने मागणी केली होती की ती एका मोठ्या हॉटेलमध्ये राहण्यासाठी देण्यात यावे, जेथे शाहरुख खान राहत होता. शूटिंग सुरू होण्यापूर्वीच तिच्या खूप मागण्या होत्या,” असे फराह म्हणाली. या सगळ्याला कंटाळून फराहने तिच्या सहकाऱ्याला फोन केला आणि आणखी कोणत्या अभिनेत्रींनी ऑडिशन दिले होते असा प्रश्न विचारला. त्यावर त्याने राखी सावंतचे देखील नाव घेतले.
वाचा: तो डुकरासारखा खातो… सलमानविषयी अभिनेत्यानं केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा
फरहा राखीचा उल्लेख करत म्हणाली की, “राखी बुरखा घालून ऑडिशनला आली होती. ‘हॉट गर्ल’ची भूमिका होती. राखीने तिच्या टिपिकल स्टाईलमध्ये त्याला कॅमेरा रोल करायला सांगितला. मग तिने बुरखा काढला आणि आत तिने फक्त बिकिनी घातली होती. कॅमेरामनलाही हे अपेक्षित नव्हते, त्यामुळे ते सगळं पाहून सर्वजण चकित झाले होते. पण तिचे केस केसरी असल्याने आम्ही तिला लगेच सिनेमात घेतले नाही, मग आम्ही दार्जिलिंगला शुटिंगसाठी आलो. राखीला आम्ही सेटवर नीट कपडे घालायला द्यायचो. मी तिला स्वेटर आणि इतर वस्तू देत होते. पण तिला मात्र एक्सपोज करायचे होते. मग मी तिला म्हणायचे की तू या पूर्ण कपड्यांमध्येही सुंदर दिसतेस.”
संबंधित बातम्या