चैतन्यसोबत साक्षीही पोहोचली अर्जुन-सायलीच्या घरात! ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये होणार मोठा राडा!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  चैतन्यसोबत साक्षीही पोहोचली अर्जुन-सायलीच्या घरात! ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये होणार मोठा राडा!

चैतन्यसोबत साक्षीही पोहोचली अर्जुन-सायलीच्या घरात! ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये होणार मोठा राडा!

Apr 22, 2024 04:31 PM IST

चैतन्य स्वतःबरोबर साक्षीला देखील अर्जुनच्या घरी घेऊन जाणार आहे. अचानक चैतन्यसोबत आलेल्या साक्षीला बघून सगळे सुभेदार भडकणार आहेत.

चैतन्यसोबत साक्षीही पोहोचली अर्जुन-सायलीच्या घरात! ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये होणार मोठा राडा!
चैतन्यसोबत साक्षीही पोहोचली अर्जुन-सायलीच्या घरात! ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये होणार मोठा राडा!

ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात मोठा राडा होताना बघायला मिळणार आहे. अर्जुनला त्याचा मित्र कुणाल आणि साक्षी यांच्या नात्याबद्दल कळलं आहे. साक्षीने धोका दिल्यामुळे कुणालने आत्महत्या केली होती, हे देखील आता अर्जुनच्या समोर आले आहे. त्यामुळे साक्षीचा खरा चेहरा आता चैतन्य समोर आणलाच पाहिजे, असं म्हणत अर्जुन आता चैतन्यला फोन करून घरी बोलवणार आहे. आपण आपला एक मित्र गमावला. मात्र, आता दुसऱ्या मित्राचा तरी जीव वाचवूया, याच उद्देशाने सायली आणि अर्जुन चैतन्यला समजावण्याचा प्रयत्न करत आहेत.

एकीकडे अर्जुनने फोन केल्यामुळे चैतन्य काहीसा सुखावला होता. मात्र, आता चैतन्य स्वतःबरोबर साक्षीला देखील अर्जुनच्या घरी घेऊन जाणार आहे. अचानक चैतन्यसोबत आलेल्या साक्षीला बघून सगळे सुभेदार भडकणार आहेत. मात्र, मी केवळ अर्जुनच्या सांगण्यावरून इथे आलो असून, त्यानेच आपल्याला कामानिमित्ताने बोलावलं आहे आणि मी जिथे जाईन तिथे साक्षी माझ्यासोबतच असेल, असं म्हणून चैतन्य थेट घरात शिरणार आहे. यावेळी सुभेदार कुटुंबातील सगळ्यांनाच खूप राग येणार आहे. साक्षीच्या वडिलांनी म्हणजेच महिपत शिखरेन केलेले सगळे कारनामे आठवून सुभेदार मंडळी साक्षीवर पुन्हा चिडणार आहे. तर, त्यांच्यापासून साक्षीला वाचवत चैतन्य आता तिला घेऊन अर्जुनच्या रूममध्ये जाणार आहे.

मोठी बातमी! ऐन प्रदर्शनाच्या मार्गावर असलेला ‘संघर्षयोद्धा’ सेन्सॉर बोर्डने अडवला! आता कधी रिलीज होणार?

साक्षीला पाहून अर्जुन चिडणार!

यावेळी चैतन्यला बघून अर्जुन खूप खूश होणार आहे. मात्र, चैतन्यच्या मागोमागे साक्षीला आपल्या रूममध्ये येताना पाहून अर्जुनच्या रागाचा पारा चांगलाच चढणार आहे. साक्षीला तिथे आलेले पाहून आता अर्जुन चैतन्यवर चिडणार असून, मला तुझ्या एकट्याशी बोलायचं होतं आणि ते फार महत्त्वाचं होतं, असं म्हणून साक्षीला तिथून जायला सांगणार आहे. मात्र, ‘तुला जे बोलायचं असेल ते साक्षी समोरच बोल, लवकरच आम्ही लग्न करणार आहोत, त्यामुळे माझ्या प्रत्येक गोष्टी साक्षीला माहिती असणं गरजेचं आहे’, असं म्हणत चैतन्य साक्षीला तिथेच थांबायला लावणार आहे.

चैतन्य अर्जुनला सुनावणार!

तर, अर्जुन मात्र चैतन्यला खूप समजावण्याचा प्रयत्न करणार आहे. ‘मला तुला काहीतरी खूप महत्त्वाचं सांगायचं आहे, जे मी फक्त तुला एकट्याला सांगू शकतो’, असं म्हणत तो चैतन्याकडे विनवणी करणार आहे. मात्र, चैतन्य अर्जुनचं काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. साक्षीबद्दल बोलत असल्यामुळे आता तो अर्जुनवरच चिडणार असून, तुला सांगायचं असेल तर सांग नाहीतर, नको सांगू असं म्हणून साक्षीला घेऊन तिथून निघून जाणार आहे. तर, चैतन्यच्या या वागण्यामुळे अर्जुनला देखील धक्का बसला आहे. आता आपल्या मित्राला साक्षीच्या तावडीतून कसं वाचवायचं, यासाठी दुसरी शक्कल लढवण्याचा प्रयत्न अर्जुन करणार आहे. मालिकेच्या येत्या भागात हा राडा बघायला मिळणार आहे.

Whats_app_banner