Tharala Tar Mag Serial Set: ‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या सगळ्याच बाबतीत अव्वल ठरत आहे. एकीकडे कथानकात रंजक वळण येत असताना, दुसरीकडे टीआरपी शर्यतीतही मालिका अग्रक्रमी आहे. एखाद्या मालिकेचं शूटिंग कसं होतं, हे जाणून घेण्याची सगळ्यांनाच उत्सुकता असते. आता या मालिकेत झळकणाऱ्या अभिनेत्री रुचिरा जाधव हिने याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रुचिराने ‘ठरलं तर मग’ या मालिकेचा सेट तर दाखवलाच, मात्र एखादा सीन कसा शूट होतो याची झलकही तिने दाखवली आहे.