मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  यापुढे कधी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही!; चिन्मय मांडलेकरने घेतला मोठा निर्णय

यापुढे कधी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही!; चिन्मय मांडलेकरने घेतला मोठा निर्णय

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 21, 2024 03:53 PM IST

अभिनेता चिन्मय मांडलेकर याने इथून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका न साकारण्याचा निर्णय घेतला आहे.

यापुढे कधी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही!; चिन्मय मांडलेकरने घेतला मोठा निर्णय
यापुढे कधी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही!; चिन्मय मांडलेकरने घेतला मोठा निर्णय

अभिनेता चिन्मय मांडलेकर याने इथून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका न साकारण्याचा निर्णय घेतला आहे. मुलाच्या नावावरून चिन्मय आणि त्याच्या कुटुंबियांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. कुटुंबाला मानसिक त्रास नको, म्हणून हा निर्णय चिन्मय मांडलेकरने घेतला आहे. मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता चिन्मय मांडलेकर सध्या वेगळ्याच कारणामुळे प्रचंड ट्रोल होत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने एका पॉडकास्टला एक मुलाखत दिली होती. या मुलाखती दरम्यान त्याच्या मुलाचा नावाचा विषय निघाला होता. चिन्मय मांडलेकर याच्या मुलाचे नाव‘जहांगीर’ आहे. यावरून अभिनेत्याला आणि त्याच्या कुटुंबाला प्रचंड ट्रोल केले गेले.

ट्रेंडिंग न्यूज

या व्हिडीओमध्ये चिन्मय मांडलेकर म्हणाला की, 'या व्हिडीओमध्ये चिन्मय मांडलेकर म्हणाला की, गेल्या काही दिवसांपासून सतत त्याला आणि त्याच्या कुटुंबाला मोठ्या ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. हे ट्रोलिंग त्याच्या कामामुळे नाही, तर त्याच्या मुलाच्या नावावरून होत आहे. नुकताच त्याच्या पत्नीने म्हणजेच नेहा जोशी-मांडलेकर हिने देखील एक व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावर शेअर केला होता. यामध्ये तिने देखील याच मुद्द्यावर आपला राग व्यक्त केला होता. नेहाने व्हिडीओ शेअर केल्यानंतर आता चिन्मयने देखील एक व्हिडीओ शेअर करत मोठा निर्णय घेतला आहे. प्रेक्षकांना आवाहन करताना चिन्मय म्हणाला की, ‘तुम्ही मला माझ्या कामावरून वाटेल ते बोला. मी ऐकून घ्यायला तयार आहे. मात्र, उगाचच चुकीचा विषय घेऊन माझ्या कुटुंबावर आणि त्यांच्या चारित्र्यावर बोलण्याचा अधिकार कोणालाही नाही.’

Horror Films: सस्पेन्स, थ्रिलर आणि हॉररने उडेल थरकाप; चुकूनही एकट्यात बघू नका ‘या’ ५ वेब सीरिज

..तर तुम्ही मला काहीही बोला!

पुढे चिन्मय म्हणाला की, ‘मी साकारत असलेल्या भूमिका तुम्हाला आवडल्या किंवा नाही आवडल्या, तर तुम्ही जे म्हणाल ते मी ऐकून घेईन. मात्र, आता माझ्या मुलाच्या नावावरून त्याच्या चारित्र्यावर, त्याच्या पालकांवर आणि माझ्या पत्नीच्या चरित्र्यावर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एक माणूस म्हणून मला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. आजवर मी अनेक भूमिका केल्या. मात्र माझ्या भूमिकांमुळे माझ्या कुटुंबाला त्रास होणार असेल, तर तो मला कदापि मान्य नाही आणि म्हणूनच मी यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.’

पंकज त्रिपाठीवर कोसळला दुःखाचा डोंगर! रस्ते अपघातात गमावली जवळची व्यक्ती; बहीणही गंभीर जखमी

अभिनेत्याने घेतला मोठा निर्णय

तू चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सकारातोस आणि मुलाचं नाव जहांगीर का? असं म्हणत अनेकांनी त्यांना अश्लाघ्य भाषेत ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे यापुढे मी कोणत्याही चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही, असा निर्णय जाहीर करत चिन्मय मांडलेकरने चाहत्यांना आणि प्रेक्षकांना एक मोठा धक्का दिला आहे. नेहा जोशी-मांडलेकर हिने व्हिडीओ शेअर केल्यानंतर ट्रोलिंग थांबण्याऐवजी आणखीनच वाढले आहे. नेहा जोशी-मांडलेकर हिच्या व्हिडीओवर देखील ट्रोलर्सनी जोरदार हल्लाबोल केला आहे. या व्हिडीओच्या कमेंट्समध्ये देखील अनेक अर्वाच्य कमेंट्स वाचायला मिळत आहे. यामुळेच चिन्मय आणि त्याच्या कुटुंबाला मानसिक त्रास होत आहे. यातूनच अभिनेत्याने हा मोठा निर्णय घेत सगळ्यांनाच धक्का दिला आहे.

IPL_Entry_Point