‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात प्रेक्षकांना मानसी आणि सायलीमधील गैरसमज दूर होताना दिसणार आहे. मानसी ही अर्जुनची कॉलेज मैत्रीण अनेक दिवसानंतर त्याला भेटण्यासाठी सुभेदारांच्या घरी आली होती. यावेळी अतिशय मोकळ्या मनाने ती अर्जुनबरोबर वागत होती. आपला नवऱ्याबरोबर परक्या स्त्रीची जवळीक पाहून सायलीला खूप राग येत होता. त्यानंतर अर्जुन आणि त्याच्या वर्गमित्रांनी रियुनियन पार्टीचा प्लॅन केला होता. या पार्टीत अर्जुन आपली बायको सायली हिला देखील सोबत घेऊन गेला. त्याच पार्टीत चैतन्य हा साक्षी शिखरेला त्याची गर्लफ्रेंड म्हणून सोबत घेऊन गेला होता. तर, साक्षीला तिथं पाहून अर्जुनचा पारा चांगलाच चढला होता. चैतन्य या सगळ्या गोष्टी मुद्दाम करतोय, हे अर्जुनच्या लक्षात आलं होतं.
मात्र, अर्जुनने या सगळ्यावर मौनच राखलं. दुसरीकडे अर्जुनच्याच वर्गातल्या एका मुलाने साक्षीला ओळखले. तो साक्षी आणि चैतन्यजवळ जाऊन तिला प्रश्न विचारू लागला की, तू कधी आमच्या कॉलेजला आली होतीस का? आपण या आधी पहिला कधी भेटलो आहोत का? त्याचे प्रश्न ऐकताच साक्षी चांगलीच गडबडली. ‘तुझा गैरसमज आहे. मी आधी कधीच इथे आले नव्हते’, असं म्हणत साक्षीनं त्या मुलाला टाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सगळेजण पार्टी एन्जॉय करत होते. त्यावेळी सायली मानसीच्या जवळ जाऊन तिला काही प्रश्न विचारू लागली. सायलीने मानसीला विचारलं की, ‘तू इतकी सुंदर आहेस, मग इतकी वर्ष होऊनही तू अजूनही लग्न का केलं नाही?’ यावर मानसीने तिला उत्तर दिलं की, ‘मला माझ्या मनात असलेल्या मुलासारखा जोडीदार सापडलाच नाही, म्हणून मी अजूनही सिंगल आहे.’
तर, सायलीने मुद्दाम मानसीला विचारलं की, ‘तू आणि अर्जुन कॉलेजमध्ये खूप चांगले मित्र होतात. मग तू त्याच्या प्रेमात पडली नाहीस का? तुला त्याच्याशी लग्न करावं, असं वाटलं नाही का?’ यावर तिची मस्करी करण्याच्या मूडमध्ये मानसी म्हणाली की, ‘माझं अर्जुनवर खूप प्रेम आहे. मी त्याच्याशी लग्न करू शकते.’ मात्र, हे ऐकल्यानंतर सायली चांगलीच संतापली तिने मानसीला खडे बोल सुनावले. सायलीचा हा अवतार पाहून मानसीही थोड्या वेळासाठी घाबरून गेली होती. यावेळी मानसी आपण गंमत करत असल्याचं म्हणत सायलीला समजावण्याचा प्रयत्न केला. यानंतर सायलीने देखील मानसीला ती अर्जुनच्या जवळ जात होती, तेव्हा तिला कसं वाटत होतं, हे अगदी उलगडून सांगितलं.
अर्जुन सारखीच त्याची बायको देखील खूप गोड आहे, असं म्हणत मानसीने सायलीची समजूत घातली आणि दोघींमध्ये असलेले गैरसमज देखील दूर केले. त्यानंतर आता मानसी सायलीची देखील चांगली मैत्रीण झाली आहे. दुसरीकडे, सायलीला साक्षीचा फोटो दिसला आणि तिला धक्काच बसला. सायली हा फोटो घेऊन घरी आली आणि तिने अर्जुनला हा फोटो दाखवला. अर्जुन हा फोटो बघतात रडू लागला. हा फोटो अर्जुनच्या एका खूप जवळच्या मित्राचा होता. अर्जुनचा कॉलेजमधील बेस्टफ्रेंड कुणालला मिठी मारतानाचा साक्षीचा हा फोटो पाहून त्यालाही चांगलाच धक्का बसला. कुणालने कॉलेजमध्ये असताना आत्महत्या केली होती. कुणालला त्याच्या गर्लफ्रेंडने धोका दिला होता. कुणालची गर्लफ्रेंड साक्षी शिखरे असल्याचे समोर आल्यानंतर आता अर्जुन आणि सायलीला चैतन्याची काळजी वाटत आहे. आता अर्जुन साक्षीचं खरं रूप चैतन्य समोर आणू शकेल का? आणि चैतन्याचा जीव वाचवू शकेल का?, हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या