छोट्या पडद्यावरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेच्या आजच्या भागात अभिराम जहागीरदार त्याच्या पहिल्या पत्नीची म्हणजेच अंतराची अंगठी लीलाच्या हातात ठेवताना दिसणार आहे. लग्नाची तयारी सुरू होण्याआधी आजीने सगळ्यांना देवाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात बोलावलं होतं. मंदिरातून बाहेर पडल्यावर आजीने अभिराम आणि लीला यांना एकत्र बाहेर जाण्यास सांगितलं होतं. तर, मी अभिरामच्या गाडीतून जाणार नाही, त्या उलट अभिरामने माझ्यासोबत माझ्या स्कूटरवरून यावं तरच मी त्यांच्यासोबत जाईन, अशी अट लीलाने घातली होती. तर, लीलाची ही अट अभिरामने देखील मान्य केली.
आता लीलासोबत बाहेर जाण्यासाठी अभिराम तिच्या घरी पोहोचणार आहे. त्यावेळी तिथं विक्रांत लीलाला धमकी देण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, अभिराम वेळेत पोहोचल्याने विक्रांत पकडला गेला आणि त्याला पुन्हा एकदा अभिरामच्या रागाला सामोरे जावे लागले आहे. तर, अभिराम वेळेत तिथे पोहोचल्याने लीलाने देखील सुटकेचा निश्वास टाकला आहे. आता विक्रांत लीलाच्या घरून निघून गेला आहे. तर, आता लीला अभिरामला लग्न मोडण्याविषयी बोलणार आहे. मात्र, मी लग्न मोडायला नाही आलोय, हे लग्न ठरल्याप्रमाणेच होणार, असं म्हणत अभिराम लीलाच्या हातावर एक अंगठीची डबी ठेवणार आहे.
लीलाला दिलेली ही अंगठी अभिरामसाठी खूपच खास आहे. कारण ही अंगठी त्याच्या पहिल्या बायकोची म्हणजेच अंतराची अंगठी आहे. यावेळी अंगठी अंतराकडे सोपवताना अभिराम तिला म्हणतो की, मी साखरपुड्याच्या दिवशी हीच अंगठी तुझ्या बोटात घालणार आहे. तोपर्यंत ही अंगठी सांभाळून ठेवणं तुझं काम आहे. ही अंगठी लीलाने स्वतःकडे ठेवून तर घेतली. मात्र, आता अभिराम दर पंधरा-वीस मिनिटांनी लीलाला व्हिडीओ कॉल करून ही अंगठी तिच्याजवळ आहे की, नाही हे तपासून बघत आहे.
आता अभिरामला वैतागलेल्या लीलाने एक नवी शक्कल लढवली आहे. ती अभिरामला आपली अंगठी हरवल्याचे सांगणार आहे. मात्र, ही अंगठी हरवलेलं नसून, तिने एका ठिकाणी लपवून ठेवलेली आहे. लीलाने अंगठी हरवली, हे कळतात अभिराम चिडणार आहे. ही अंगठी त्याच्यासाठी खूपच खास होती. अंतराची शेवटची आठवण असणारी तिचीही अंगठी लीलाने हरवली म्हणून अभिराम आता लीलाला बऱ्याच गोष्टी सुनावणार आहे. तुला सगळेजण वेंधळी म्हणतात, ते अगदी बरोबर आहे. तू अगदी तशीच आहेस, असं म्हणून अभिराम तिला ओरडत असतानाच लीला ती अंगठी अभिरामसमोर धरणार आहे. ‘मी काहीही अंगठी हरवली नव्हती. तुम्हाला वैतागून ती लपवून ठेवली होती’, असं म्हणून अंतरा ही अंगठी पुन्हा अभिरामकडे देण्याचा प्रयत्न करणार आहे.