मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अभिराम लीलाची लग्न न करण्याची मागणी मान्य करणार? ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये आज काय घडणार?

अभिराम लीलाची लग्न न करण्याची मागणी मान्य करणार? ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये आज काय घडणार?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 18, 2024 03:37 PM IST

अभिराम जहागीरदारने आपल्याशी लग्न करू नये, म्हणून लीला भरपूर प्रयत्न करत आहे. लीलाने अभिरामला धमकीही दिली होती.

अभिराम लीलाची लग्न न करण्याची मागणी मान्य करणार? ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये आज काय घडणार?
अभिराम लीलाची लग्न न करण्याची मागणी मान्य करणार? ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये आज काय घडणार?

नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेच्या आजच्या भागात प्रेक्षकांना लीला आणि अभिराम यांच्या लग्नाविषयी एक मोठी अपडेट पाहायला मिळणार आहे. अभिराम जहागीरदारने आपल्याशी लग्न करू नये, म्हणून लीला भरपूर प्रयत्न करत आहे. लीलाने अभिरामला धमकीही दिली होती. मात्र, अभिराम लीलाच्या या धमकीला अजिबात घाबरलेला नाही. आता अभिरामच्या तिन्ही सुनांनी ठरवल्याप्रमाणे लीलाची परीक्षा होणार आहे. मात्र, अशी कोणतीही परीक्षा घेण्यापूर्वी आपल्या कुलदेवीच्या मंदिरात जावं, असं आजीनं ठरवलं आहे. आजीने ठरल्याप्रमाणे लीला आणि तिच्या आईला मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी बोलावले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

यावेळी लीला मंदिरात पोहोचणार आहे. मात्र, तिच्या मागेमागे अभिराम जहागीरदार देखील मंदिरात पोहोचणार आहे. गुरुजींनी देवाला प्रदक्षिणा घालून घ्या, असे म्हटल्यानंतर आता अभिराम लीलाचा हात धरून मंदिरात प्रदक्षिणा घालण्यासाठी जाणार आहे. तर, आपला हात धरल्यामुळे चिडलेली लीला अभिरामवर ओरडणार आहे. ‘गुरुजींनी फक्त प्रदक्षिणा घालायला सांगितली होती. हात पकडायला नाही. मला माझ्या पायाने प्रदक्षिणा घालता येतात, तेव्हा तुम्ही माझा हात सोडा’, म्हणून लिहिला अभिरामवर चिडणार आहे. प्रदक्षिणा पूर्ण करण्याच्या नादात लीलाच्या पायात चमक भरणार आहे.

स्मिता तांबे टीव्हीवर परतली! ‘मन धागा धागा जोडते नवा’मध्ये सार्थक-आनंदीच्या आयुष्यातल्या अडचणी वाढवणार!

लीला आणि अभिराम्मध्ये जवळीक वाढणार!

लीलाच्या पायात चमक भरल्यानंतर अभिरामला आता तिला उचलून घेऊन देवाच्या प्रदक्षिणा पूर्ण कराव्या लागणार आहेत. आता देवाचं दर्शन आणि प्रदक्षिणा झाल्यानंतर आता लीलाने अभिरामसोबत घरी जावं, असं आजी म्हणणार आहे. मात्र, आज मी अभिरामबरोबर नाही, तर अभिरामने माझ्यासोबत माझ्या स्कुटीवरून यावं, अशी अट लीला घालणार आहे. तर, अभिराम देखील लीलाची ही अटही मान्य करणार आहे. आता लीला अभिरामला मी घरी जाऊन तयार होऊन येते, तोवर तुम्ही घरी या, असं म्हणणार आहे.

अभिराम लीलाला पुन्हा लग्नासाठी विचारणार!

लीलाने लग्न रद्द करण्यासाठी अभिरामला २४ तासांचा वेळ दिला होता. आता हा २४ तासांचा वेळ संपत आला आहे. त्यामुळे अभिराम लग्न रद्द करण्याचा निर्णय घेईल, यासाठी तो आपल्या घरी येईल, असे लीलाला वाटत आहे. मात्र, आता लीलाच्या घरी पोहोचलेला अभिराम तिला अंतराची अंगठी देऊन लग्नासाठी विचारणा करणार आहे. दुसरीकडे, लीलाची सावत्र आई कालिंदी लीलाच्या लग्नानंतर आपल्याला भरपूर पैसा मिळेल, या विचारात खुश झाली आहे.

IPL_Entry_Point

विभाग