लता-रफीचे सूर अन् शंकर-जयकिशन यांच्या सुरावटींची 'अजीब दास्तां' उलगडणार! कधी आणि कुठे? वाचा!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  लता-रफीचे सूर अन् शंकर-जयकिशन यांच्या सुरावटींची 'अजीब दास्तां' उलगडणार! कधी आणि कुठे? वाचा!

लता-रफीचे सूर अन् शंकर-जयकिशन यांच्या सुरावटींची 'अजीब दास्तां' उलगडणार! कधी आणि कुठे? वाचा!

Apr 18, 2024 02:40 PM IST

शंकर-जयकिशन या जोडीने त्यांच्या सुमधुर संगीताने रसिक श्रोत्यांच्या हृदयावर राज्य केले आहे. आता त्यांच्या जुन्या गाण्यांची हीच जादू पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे.

लता-रफींच्या गाण्याची मैफल रंगणार! शंकर-जयकिशन यांच्या गाण्यांचा ‘अजीब दास्तां’ कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या...
लता-रफींच्या गाण्याची मैफल रंगणार! शंकर-जयकिशन यांच्या गाण्यांचा ‘अजीब दास्तां’ कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या... (Gaana)

जुन्या गाण्यांनी नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं आहे. लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार, शंकर-जयकिशन, मन्ना डे अशा अनेक गायक-संगीतकारांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला होता. बॉलिवूडची ही क्लासिक आणि आयकॉनिक गाणी आजही प्रेक्षकांना जिभेवर रेंगाळतात. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना या गाण्यांची जादू अनुभवायला मिळणार आहे. शंकर-जयकिशन यांच्या ‘अजीब-दास्तां’ या संगीत मैफिलीत प्रेक्षकांना आणि रसिक श्रोत्यांना या गाण्यांची जादू अनुभवायला मिळणार आहे. ‘अजीब-दास्तां’ ही मैफिल मुंबईत पार पडणार आहे. रसिक श्रोते या कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकणार आहेत.

शंकर-जयकिशन या जोडीने त्यांच्या सुमधुर संगीताने रसिक श्रोत्यांच्या हृदयावर राज्य केले आहे. आता त्यांच्या जुन्या गाण्यांची हीच जादू पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. शंकर-जयकिशन यांच्या सुरेल गाण्यांची ‘अजीब-दास्तां है ये’ ही मैफल येत्या २१ एप्रिल रोजी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. या कार्यक्रमात रसिकांना शंकर-जयकिशन या संगीतकार जोडीच्या सुमधुर गाण्यांचा अनुभव घेता येणार आहे. ‘स्वरदा कम्युनिकेशन्स अँड इव्हेंट्स’ने आयोजित केलेला हा कार्यक्रम विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात रंगणार आहे.

विक्रांत मेस्सीचा चित्रपट विक्रम रचणार! एक-दोन नव्हे तब्बल २० हजार स्क्रीन्सवर रिलीज होणार ‘12th Fail’

दिग्गजांची गाणी सादर होणार

शंकर जयकिशन या जोडीच्या सुरेल सांगीतिक प्रवासाचा आढावा या कार्यक्रमातून घेतला जाणार आहे. भारतीय शास्त्रीय संगीत हा त्यांच्या संगीताचा गाभा होता. पण, केवळ शास्त्रीय संगीतच नाही, तर त्याच्याच बरोबरीने वेस्टर्न बिट्सचाही त्यांनी खूप सुंदर वापर केला. शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी तुफान गाजली आहेत. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांना मुकेश, मोहम्मद रफी, लता मंगेशकर अशा दिग्गज गायकांनी आपला आवाज दिला आहे. त्यांच्या याच गाजलेल्या गाण्यांपैकी काही निवडक गाणी या कार्यक्रमात सादर केली जाणार आहेत.

‘या’ कामासाठी जुई गडकरी अभिनयविश्व सोडायलाही तयार! ‘सायली’ला नक्की करायचंय तरी काय?

मुकेश यांचा आवाज अशी सार्थ ओळख असलेले गायक मुख्तार शहा हे खास गुजरातहून या मैफिलीत गाण्यासाठी येणार आहेत. त्यांच्या आवाजातून साक्षात मुकेश यांच्या आवाजाचाच भास होतो. या कार्यक्रमात मुख्तार शहा हे मुकेश यांची काही गाजलेली गाणी सादर करणार आहेत. तर, गायक श्रीकांत नारायण हे मोहम्मद रफी यांची गाणी गाणार आहेत. गायिका संजीवनी बेलांडे ह्या या कार्यक्रमात लता मंगेशकर यांची गाणी सादर करणार आहेत. कीबोर्ड वादक चिराग पांचाळ या कार्यक्रमाचे संगीत संयोजन करणार असून, त्यांच्यासोबत १५ वादकांचा चमू कार्यक्रमात गाण्यांना संगीत देणार आहे. संदीप पंचवटकर या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना सी विद्याधर यांची असून, शैलेश पेठे यांचे आयोजन असणार आहे’

कार्यक्रमाचा तपशील

कधी: २१ एप्रिल २०२४, रविवार

वेळ: रात्री ८.३० वाजता

कुठे: दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले

Whats_app_banner