आपल्या दमदार अभिनयाने अभिनेत्री जुई गडकरी हिने सगळ्या प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. सध्या जुई गडकरी हिची ‘ठरलं तर मग’ ही मालिका छोट्या पडद्यावर चांगलीच गाजत आहेत. या मालिकेत जुईने ‘सायली सुभेदार’ ही भूमिका साकारली आहे. या आधी देखील जुईने अनेक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. तिच्या ‘पुढचं पाऊल’ या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी जुई नेहमीच प्रयत्नशील असते. मात्र, अभिनयाव्यतिरिक्त जुईला इतर अनेक गोष्टी देखील आवडतात. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर आपण अभिनय सोडून काय करू शकतो, यावर भाष्य केले आहे.
काही दिवसांपूर्वी जुई गडकरी हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. यातून तिने एक खास गोष्ट प्रेक्षकांना सांगितली होती. या व्हिडीओमधील काम आपल्याला करायला मिळालं तर, मी अभिनय देखील सोडून देईन, असं जुई गडकरी हिने म्हटलं होतं. जुईने शेअर केलेल्या त्या पोस्टमध्ये एक पांडा दिसला होता. तर या पांडाला सांभाळणारी व्यक्ती ही त्याच्यासोबत खोळताना आणि त्याला जेवण भरवताना दिसली होती. हा क्युट व्हिडीओ जगभरात खूप पाहिला गेला. तर, जुई गडकरी हिला देखील हा पांडाचा व्हिडीओ खूप आवडला. तिने आपल्या सोशल मीडियावर तो शेअर केला.
क्युट पांडाचा व्हिडीओ शेअर करताना जुई गडकरीने लिहिले होते की, जर मला हे पांडा नॅनीचं काम मिळालं तर मी अभिनय क्षेत्र देखील सोडून देईन. अभिनेत्री असण्यासोबतच जुई गडकरी ही प्राणीप्रेमी देखील आहे. ती नेहमीच प्राण्यांचे वेगवेगळे व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना दिसते. जुई गडकरी हिच्याकडे पाळीव माजर देखील आहे. या मांजराचे व्हिडीओ आणि फोटो ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. या मांजरासोबत खेळतानाचे जुईचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जुई जिथे जाईल तिथे ती नव्या प्राण्यांसोबत मैत्री करताना दिसते. ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर देखील तिने काही मांजरं पाळली आहेत.
जुई गडकरीचं हे प्राणीप्रेम पाहून चाहते देखील भारावून जातात. त्यामुळेच आपल्याला असं एखादं प्राण्यासोबतच राहायला मिळेल असं काम मिळालं, तर मी अभिनय सोडून देईन, असं जुई म्हणाली आहे. मालिकांमधून प्रेक्षकांच्या मन जिंकून घेणारी जुई, तिच्या प्रेमळ वागण्याने प्राण्यांचं मन ही जिंकून घेते. ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून जुई गडकरी प्रेक्षकांच्या घरघरात पोहोचली आहे.