मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Oscars 2023: ऑस्कर नामांकनात ‘आरआरआर’ने मिळवली जागा; ‘छेल्लो शो’ला देखील ‘या’ विभागात मिळालं नॉमिनेशन!

Oscars 2023: ऑस्कर नामांकनात ‘आरआरआर’ने मिळवली जागा; ‘छेल्लो शो’ला देखील ‘या’ विभागात मिळालं नॉमिनेशन!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 22, 2022 09:38 AM IST

RRR and Chhello Show in Oscars 2023: भारतीय चित्रपटसृष्टीसाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. यंदा ऑस्कर शर्यतीत दोन चित्रपट निवडले गेले आहेत.

Oscars 2023 nominations
Oscars 2023 nominations

RRR and Chhello Show in Oscars 2023: अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस अर्थात ऑस्करने ९५व्या अकादमी पुरस्कारांसाठी निवडलेल्या चित्रपटांची नावे जाहीर केली आहेत. यंदा ऑस्करच्या शर्यतीत भारतातील २ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. भारतासह जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या ‘आरआरआर’ने आता ऑस्कर नामांकनामध्ये देखील स्थान पटकावले आहे. तर, भारताकडून अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवण्यात आलेल्या ‘छेल्लो शो’ या चित्रपटाला देखील ऑस्करमध्ये नामांकन मिळाले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

भारतीय चित्रपटसृष्टीसाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. यंदा ऑस्कर शर्यतीत दोन चित्रपट निवडले गेले आहेत. आपल्या चित्रपटाला ऑस्करमध्ये प्रवेश मिळावा यासाठी राजामौली यांनी खूप मेहनत घेतली होती. या चित्रपटाने रिलीज होताच जगभरात चांगलीच खळबळ उडवून दिली होती. ऑस्करच्या 'सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म'सह १४ श्रेणींमध्ये नामांकनासाठी हा चित्रपट पाठवण्यात आला होता.

बुधवारी ऑस्करमधील १० श्रेणींसाठीची नामांकन यादी जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका असलेला 'छेल्लो शो' (द लास्ट फिल्म शो) या चित्रपटाला देखील नामांकन यादीत स्थान मिळाले आहे. ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म' श्रेणीमध्ये ‘छेल्लो शो’ला नामांकन जाहीर झाले आहे. तर, ‘आरआरआर’च्या ‘नाटू नाटू’ या गाण्याला ‘मूळ गाणे’ अर्थात ‘ओरिजिनल साँग’ या श्रेणीत नामांकन मिळाले आहे.

‘छेल्लो शो’सोबतच 'सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म' श्रेणीतील इतर चित्रपटांमध्ये 'अर्जेंटिना १९८५', 'द क्वाईट गर्ल', 'द ब्लू काफ्तान' आणि इतर काही चित्रपटांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यंदाच्या ऑस्कर शर्यतीत पाकिस्तानातील चित्रपटाने देखील स्थान मिळवले आहे. पाकिस्तानी चित्रपट ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पाकिस्तानी चित्रपट 'जॉयलँड'ला देखील या श्रेणीत नामांकन मिळाले आहे.

IPL_Entry_Point

विभाग