मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Maharashtracha Favourite Kon: यंदा कोण ठरणार ‘महाराष्ट्राचा फेवरेट’? नामांकनं जाहीर!

Maharashtracha Favourite Kon: यंदा कोण ठरणार ‘महाराष्ट्राचा फेवरेट’? नामांकनं जाहीर!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 22, 2022 08:05 AM IST

Maharashtracha Favourite Kon: ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ या पुरस्कारासाठीच्या विविध विभागात नामांकन मिळालेल्या कलाकारांची नावं आता निश्चित झाली आहेत.

Maharashtracha Favourite Kon
Maharashtracha Favourite Kon

Maharashtracha Favourite Kon Nominations: मराठी मनोरंजन विश्वात अतिशय मानाचा समजला जाणारा ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ हा पुरस्कार सोहळा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या पुरस्कारासाठी नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. मनोरंजन करण्यासाठी जे कलाकार त्यांच्या अभिनयाचा कस लावतात, पडद्यामागचे कलावंत कष्ट घेतात त्यांच्या कलेला पुरस्काराने गौरवणारा हा सोहळा असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रसिक प्रेक्षकांनी दिलेल्या मतांमधूनच ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ हे ठरले जाते. त्यामुळे या पुरस्कार सोहळ्याकडे कलाकार आणि रसिकांचं लक्ष लागलेलं असतं.

‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ या पुरस्कारासाठीच्या विविध विभागात नामांकन मिळालेल्या कलाकारांची नावं आता निश्चित झाली आहेत. नामांकन मिळालेल्या कलाकारांपैकी रसिकांची पसंती कुणाला मिळणार हे ठरवण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. या स्पर्धेत जे प्रेक्षक आपली मते नोंदवतील त्यातील काही निवडक भाग्यवान प्रेक्षकांना त्यांच्या परिवारासह मुख्य इव्हेंटमध्ये सहभागी होण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे.

प्रेक्षक दोन पद्धतीने आपले मत नोंदवू शकतात. पहिली पद्धत म्हणजे, ‘झी ५’च्या वेबसाईटवर जाऊन आपल्या आवडत्या कलाकारांना वोट करू शकतात. त्याच बरोबर ९१६०००१२१० या ऑफिशियल व्हाटसअ‍ॅप क्रमांकावर ‘वोट’ किंवा ‘VOTE’ असे टाईप करून नामांकन पाहू शकतात आणि आपल्या आवडत्या कलाकारांना आपले मत देऊ शकतात.

एकूण बारा विभागातून ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’ या पुरस्काराचे मानकरी ठरणार आहेत. यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सहाय्यक अभिनेता, सहाय्यक अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट खलनायक, लोकप्रिय चेहरा, लोकप्रिय स्टाईल आयकॉन, सर्वोत्कृष्ट गीत, सर्वोत्कृष्ट गायक, सर्वोत्कृष्ट गायिका अशा एकूण १२ विभागांचा समावेश आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या नामांकन यादीत ‘धर्मवीर’, ‘चंद्रमुखी’, ‘पांडू’, ‘दे धक्का २’, ‘टाइमपास ३’, ‘हर हर महादेव’, ‘शेरशिवराज’ आणि ‘झोंबिवली’ या चित्रपटांना स्थान मिळालं आहे. आता यातून महाराष्ट्राचा फेव्हरेट चित्रपट कोणता होणार याची उत्सुकता वाढली आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या स्पर्धेत प्रवीण तरडे, प्रसाद ओक, विजू माने, महेश आणि सुदेश मांजरेकर, अभिजित देशपांडे, रवी जाधव, दिग्पाल लांजेकर आणि आदित्य सरपोतदार ही नावं आहेत. यामध्ये कोण बाजी मारणार हे लवकरच समोर येईल.

‘महाराष्ट्राचा फेव्हरेट अभिनेता कोण’ याकडे लक्ष लागलेल्या प्रेक्षकांसमोर अभिनेत्यांची नामांकन यादी देखील आली आहे. यामध्ये प्रसाद ओक, आदिनाथ कोठारे, भाऊ कदम, मकरंद अनासपुरे, शरद केळक, प्रथमेश परब, ललित प्रभाकर आणि अमेय वाघ यांची नावं निश्चित झाली आहेत. तर, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या नामांकन यादीमध्ये अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, हृता दुर्गुळे, रितिका श्रोत्री आणि वैदेही परशुरामी यांचा समावेश आहे. सर्वात्कृष्ट खलनायक या विभागाच्या नामांकन यादीत प्राजक्ता माळी, विद्याधर जोशी, मिलिंद शिंदे, वैभव मांगले आणि मुकेश ऋषी यांची नावं जाहीर झाली आहेत.

IPL_Entry_Point