मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Video: ‘कच्चा बदाम’ फेम अंजली अरोराचे ‘बेशरम रंग’वर ठुमके; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Video: ‘कच्चा बदाम’ फेम अंजली अरोराचे ‘बेशरम रंग’वर ठुमके; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 22, 2022 08:26 AM IST

Anjali Arora Viral Video: ‘बेशरम रंग’वरील अंजली अरोराचा डान्स खूपच कमाल झाला आहे. अंजलीने या व्हिडीओमध्ये दीपिका पदुकोणसारख्या किलर डान्स मूव्ह्स दाखवल्या आहेत.

Anjali Arora
Anjali Arora

Anjali Arora Viral Video: ‘कच्चा बदाम’ या गाण्यावर डान्स व्हिडीओ शेअर करून रातोरात व्हायरल झालेली अंजली अरोरा ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. या एका डान्स व्हिडीओने अंजली अरोराच संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. यानंतर अंजली कंगना रनौतच्या ‘लॉकअप’ शोमध्ये देखील झळकली. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करणारी अंजली आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचं कारण ठरला आहे तिचा नवा डान्स व्हिडीओ. आता अंजली अरोराने दीपिका पदुकोणच्या ‘बेशरम रंग’ या गाण्यावर ठुमके लगावले आहेत. तिचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सध्या शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणे सध्या ट्रेंडमध्ये आहे. अनेक कलाकार या गाण्यावर डान्स व्हिडीओ तयार करत आहेत. आता अंजली अरोराने देखील या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंजली खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तर, तिच्या डान्स मूव्ह देखील दीपिकाप्रमाणेच धुमाकूळ घालत आहेत. 'कच्चा बदाम'नंतर आता अंजली अरोराचा हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘बेशरम रंग’वरील अंजली अरोराचा डान्स खूपच कमाल झाला आहे. अंजलीने या व्हिडीओमध्ये दीपिका पदुकोणसारख्या किलर डान्स मूव्ह्स दाखवल्या आहेत. चाहतेही अंजलीच्या या डान्स स्किल्सचे कौतुक करत आहेत. तर, काहींनी अंजली अरोराच्या डान्स स्टेप्स दीपिकाच्या स्टेप्सपेक्षा चांगल्या असल्याचेही म्हटले आहे. गाण्यातील अंजलीचे एक्सप्रेशन आणि डान्स मूव्ह्स चाहत्यांना भावले आहेत. अंजलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, चाहते त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाउस पाडत आहेत.

भुवन बड्याकर यांच्या ‘कच्चा बदाम’ या व्हायरल गाण्यावर रील व्हिडीओ बनवून अंजली रातोरात प्रसिद्धी झोतात आली होती. या व्हिडीओनंतर सेलिब्रिटी झालेली अंजली अनेक कार्यक्रमांमध्ये झळकली. ‘लॉकअप’ या शोमध्ये सहभागी झाल्याने तिला आणखी प्रसिद्धी मिळाली. अंजली अरोराचे इन्स्टाग्रामवर तब्बल १२.२ मिलिअन फॉलोअर्स आहेत.

IPL_Entry_Point

विभाग