मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024 : रसेलने मारलेला चेंडू चाहत्यानं पँटमध्ये लपवला, पोलीस कर्मचाऱ्याने असा हिसकावला, व्हिडीओ पाहा

IPL 2024 : रसेलने मारलेला चेंडू चाहत्यानं पँटमध्ये लपवला, पोलीस कर्मचाऱ्याने असा हिसकावला, व्हिडीओ पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 14, 2024 03:19 PM IST

KKR VS MI IPL 2024 : केकेआर आणि मुंबई सामन्यात केकेआरचा फलंदाज आंद्रे रसेलने जबरदस्त षटकार मारला. चेंडू सरळ प्रेक्षकांमध्ये गेला. तिथे उपस्थित असलेल्या एका तरुण चाहत्याने चेंडू पकडला आणि तो घेऊन तो स्टेडियमच्या बाहेर जाऊ लागला.

IPL 2024 : रसेलने मारलेला चेंडू चाहत्यानं पँटमध्ये लपवला, पोलीस कर्मचाऱ्याने असा हिसकावला, व्हिडीओ पाहा
IPL 2024 : रसेलने मारलेला चेंडू चाहत्यानं पँटमध्ये लपवला, पोलीस कर्मचाऱ्याने असा हिसकावला, व्हिडीओ पाहा

आयपीएल २०२४ मध्ये शनिवारी (११ मे) कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात ईडन गार्डन्सवर सामना खेळला गेला. या सामन्याचा एक व्हिडिओ समोर आला, जो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक पोलीस कर्मचारी एका चाहत्याला धक्काबुक्की करताना दिसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

केकेआरची जर्सी घातलेल्या तरुण चाहत्याने स्टँडमध्ये आलेला चेंडू त्याच्या पँटच्या आत ठेवल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने रागाने त्याच्याकडून चेंडू काढून घेतला.

वास्तविक, केकेआर आणि मुंबई सामन्यात केकेआरचा फलंदाज आंद्रे रसेलने  जबरदस्त षटकार मारला. चेंडू सरळ प्रेक्षकांमध्ये गेला. तिथे उपस्थित असलेल्या एका तरुण चाहत्याने चेंडू पकडला आणि तो घेऊन तो स्टेडियमच्या बाहेर जाऊ लागला. तर मुंबईचा क्षेत्ररक्षक चेंडूची वाट पाहत होता.

अशा स्थितीत पोलीस त्या चाहत्याच्या मागे धावले. पोलीस कर्मचाऱ्याला पाहताच चाहत्याने बॉल पँटमध्ये लपवला. तेव्हा पोलीस कर्मचाऱ्याने रागाने चाहत्याकडून चेंडू हिसकावून मैदानात खेळाडूकडे परत केला. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने चाहत्याला धक्काबुक्की करत मैदानाबाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला.

केकेआरचा दमदार विजय

चाहत्यांना हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे आणि तो वेगाने व्हायरल जाला आहे. अनेक यूजर्सने सांगितले की, हा व्हिडिओ पाहून त्यांना हसू आवरता आलेले नाही.

दरम्यान, या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा १८ धावांनी पराभव केला. पावसामुळे हा सामना १६ षटकांचा खेळवण्यात आला.

कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना १६ षटकांत ७ गडी गमावून १४७ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स संघ १६ षटकांत ८ गडी गमावून १३९ धावाच करू शकला. KKR संघ आधीच प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे तर मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला.

केकेआरचे टॉप-दोनमध्ये स्थान निश्चित

गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सोमवारचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. या सामन्यात एकही चेंडू टाकता आला नाही. यानंतर, केकेआरचे टॉप-दोनमध्ये स्थान निश्चित झाले आहे.

त्याचवेळी गुजरात टायटन्सही प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. कोलकाता नाईट रायडर्सला आता फायनलमध्ये पोहोचण्याच्या दोन संधी असतील. KKR पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभूत झाल्यास, तो दुसरा क्वालिफायर जिंकून अंतिम फेरीत प्रवेश करू शकतो.

IPL_Entry_Point