Sanju Samson : क्रेझ असावी तर अशी… संजू सॅमसनच्या चाहत्याचा अजब पराक्रम, काय केलं तुम्हीच पाहा!-rajasthan royals captain sanju samson painting on roof by fan in kerala watch video photos ipl 2024 ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Sanju Samson : क्रेझ असावी तर अशी… संजू सॅमसनच्या चाहत्याचा अजब पराक्रम, काय केलं तुम्हीच पाहा!

Sanju Samson : क्रेझ असावी तर अशी… संजू सॅमसनच्या चाहत्याचा अजब पराक्रम, काय केलं तुम्हीच पाहा!

May 14, 2024 07:57 PM IST

Sanju Samson IPL 2024 : राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनचे असंख्य चाहते आहेत. त्याच्या एका चाहत्याने घराच्या छतावर एक संजू सॅमसनची पेंटिंग बनवली आहे.

Sanju Samson : क्रेझ असावी तर अशी… संजू सॅमसनच्या चाहत्याचा अजब पराक्रम, काय केलं तुम्हीच पाहा!
Sanju Samson : क्रेझ असावी तर अशी… संजू सॅमसनच्या चाहत्याचा अजब पराक्रम, काय केलं तुम्हीच पाहा!

sanju samson painting on roof : राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने आयपीएल २०२४ मध्ये चमकदार कामगिरी केली आहे. सॅमसनसोबतच त्याच्या संघानेही चांगली कामगिरी केली आहे. राजस्थान सध्या पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. संजू सॅमसनच्या चाहत्यांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे.

त्याची क्रेझ किती आहे, हे त्याला टीम इंडियातून वगळल्यानंतर लक्षात येते. तसेच, स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहिल्यानंतरदेखील संजूच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. दरम्यान, आता एक जबरदस्त व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये संजू सॅमसनचा कट्टर फॅन त्याच्यासाठी खास पेंटिंग तयार करताना दिसत आहे.

वास्तविक, राजस्थान रॉयल्सने X वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये केरळमधील एक चाहता संजू सॅमसनचे पेंटिंग बनवताना दिसत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो त्याच्या घराच्या छतावर पेंटिंग करतोय. याआधीही सॅमसनची अनेक पेंटिंग काढण्यात आली आहेत. मात्र एखाद्या चाहत्याने छतावर पेंटिंग करण्याची ही पहिलीच वेळ आहे. राजस्थानमधील हा व्हिडिओ X वर खूप पसंत केला जात आहे. यावर चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

संजू सॅमसन जबरदस्त फॉर्मात

संजू सॅमसनने आयपीएल २०२४ मध्ये जबरदस्त फॉर्मात आहे. या मोसमात त्याने १२ सामन्यात ४८६ धावा केल्या आहेत. या काळात त्याने ५ अर्धशतके झळकावली आहेत. सॅमसनची सर्वोत्तम धावसंख्या ८६ धावा आहे.

सॅमसनने आयपीएलच्या १६४ सामन्यांमध्ये ४३७४ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने ३ शतके आणि २५ अर्धशतके केली आहेत. सॅमसनची आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या ११९ धावा आहे.

पॉइंट टेबलमध्ये राजस्थान दुसऱ्या स्थानावर

आयपीएल २०२४ मधील राजस्थानची कामगिरी पाहिली तर तीही जबरदस्त आहे. राजस्थानने या यंदा आतापर्यंत १२ सामने खेळले असून ८ सामने जिंकले आहेत. त्यांना ४ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. पॉइंट टेबलमध्ये राजस्थान दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांचे १६ गुण आहेत. गुणतालिकेत कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानावर आहे.

Whats_app_banner