DC Vs LSG : दिल्ली कॅपिटल्सचा रोमहर्षक विजय, लखनौचा १९ धावांनी पराभव
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  DC Vs LSG : दिल्ली कॅपिटल्सचा रोमहर्षक विजय, लखनौचा १९ धावांनी पराभव

DC Vs LSG : दिल्ली कॅपिटल्सचा रोमहर्षक विजय, लखनौचा १९ धावांनी पराभव

May 14, 2024 11:29 PM IST

DC Vs LSG IPL Live Score : आयपीएल २०२४ मध्ये आज दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने आहेत. या सामन्याचा लाईव्ह स्कोअर येथे पाहा.

DC Vs LSG IPL Live Score
DC Vs LSG IPL Live Score

आयपीएल २०२४ च्या ६४ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना लखनौ सुपर जायंट्सशी होत आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. दिल्लीसाठी हा करा किंवा मरोचा सामना आहे. जर संघ हरला तर ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर जातील. 

त्याचबरोबर नेट रनरेट सकारात्मक करण्यासाठी दिल्ली संघाला केवळ जिंकावेच लागणार नाही, तर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. दिल्ली आणि लखनौचे प्रत्येकी १२ गुण आहेत. दिल्लीचा हा १४वा सामना आहे, तर लखनौचा १३वा सामना आहे.

दिल्ली वि. लखनौ लाईव्ह क्रिकेट स्कोअर

निकोलस पूरन बाद

लखनौला मोठा धक्का बसला आहे. संघासाठी चांगली फलंदाजी करणारा निकोलस पुरन बाद झाला आहे. तो २७ चेंडूत ६१ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. पुरनने ६ चौकार आणि ४ षटकार मारले. त्याला मुकेश कुमारने बाद केले. लखनौने ११.१ षटकांत ६ गडी गमावून १०१ धावा केल्या आहेत.

केएल राहुल पहिल्याच षटकात बाद

इशांत शर्माने पहिले षटक टाकले. षटकाच्या पाचव्या चेंडूवर इशांतने केएल राहुलला मुकेश कुमारच्या हाती झेलबाद केले. राहुलने ३ चेंडूत ५ धावा केल्या.

दिल्लीच्या २०८ धावा

दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सला विजयासाठी २०९ धावांचे लक्ष्य दिले आहे. दिल्लीकडून अभिषेक पोरेलने अर्धशतक झळकावले. त्याने ३३ चेंडूत ५८ धावा केल्या. यादरम्यान त्याने ५ चौकार आणि ४ षटकार मारले. ट्रिस्टन स्टब्सने नाबाद ५७ धावा केल्या. त्याने २५ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकार ठोकले. 

अक्षर पटेल १४ धावा करून नाबाद राहिला. शाई होपने ३८ धावा केल्या. ऋषभ पंतने ३३ धावांची खेळी केली. अशा प्रकारे दिल्लीने २०८ धावा केल्या.

लखनौकडून नवीनने २ बळी घेतले. अर्शद आणि रवी बिश्नोई यांनी १-१ विकेट घेतली.

दिल्लीला तिसरा धक्का

दिल्लीला तिसरा धक्का १२व्या षटकात १११ धावांवर बसला. अभिषेक पोरेल 33 चेंडूंत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५८ धावा करून बाद झाला. त्याला नवीन उल हकने निकोलस पूरनच्या हाती झेलबाद केले. सध्या कर्णधार ऋषभ पंत आणि ट्रिस्टन स्टब्स क्रीजवर आहेत.

५ षटकात ५६ धावा

दिल्लीच्या डावातील ५ षटके पूर्ण झाली आहेत. संघाने १ गडी गमावून ५६ धावा केल्या आहेत. शाई होप आणि अभिषेक पोरेल यांच्यातील अर्धशतकी भागीदारी पूर्ण झाली. पोरेल २७ धावा करून खेळत आहे. होप २५ धावांर खेळत आहे.

दिल्लीची आक्रमक फलंदाजी

तीन षटकांनंतर दिल्लीने एक विकेट गमावून ३५ धावा केल्या आहेत. पहिल्याच षटकात जेक फ्रेझर मॅकगर्कची विकेट गमावल्यानंतर दिल्लीने जबरदस्त पुनरागमन केले आहे. अभिषेक पोरेल आक्रमक फलंदाजी करत आहे. सध्या पोरेल ९ चेंडूत २६ धावा तर शाई होप ७ चेंडूत ५ धावांवर खेळत आहे.

दिल्लीला पहिल्याच षटकात धक्का

दिल्लीला पहिल्याच षटकात पहिला धक्का बसला. या स्पर्धेत शानदार फलंदाजी करणाऱ्या जेक फ्रेझर मॅकगर्कला आपले खातेही उघडता आले नाही. अर्शद खानने त्याला नवीन उल हककरवी झेलबाद केले. सध्या शाई होप आणि अभिषेक पोरेल क्रीजवर आहेत.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक पोरेल, जेक फ्रेझर-मॅकगुर्क, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, गुलबदिन नायब, रसिक दार सलाम, मुकेश कुमार, कुलदीप यादव, खलील अहमद.

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, कृणाल पंड्या, युधवीर सिंग चरक, अर्शद खान, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान .

लखनौने टॉस जिंकला

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुलने सांगितले की युधवीर सिंग चरक आणि अर्शद खान संघात परतले आहेत.

त्याचवेळी दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की त्याच्या प्लेइंग-११ मध्ये दोन बदल आहेत. कुमार कुशाग्रच्या जागी पंतचे पुनरागमन झाले आहे. बंदीमुळे तो शेवटच्या सामन्यात खेळला नव्हता. त्याचबरोबर डेव्हिड वॉर्नरच्या जागी गुलबदिन नायबचे संघात पुनरागमन झाले आहे.

Whats_app_banner