DC vs LSG Dream 11 Team Prediction : आज दिल्ली-लखनौ भिडणार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  DC vs LSG Dream 11 Team Prediction : आज दिल्ली-लखनौ भिडणार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम

DC vs LSG Dream 11 Team Prediction : आज दिल्ली-लखनौ भिडणार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम

May 14, 2024 03:02 PM IST

DC vs LSG Dream 11 Team Prediction : आयपीएल २०२४ चा ६४ वा सामना आज लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आहे. दोन्ही संघ दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर आमनेसामने येतील.

DC vs LSG Dream 11 Team Prediction
DC vs LSG Dream 11 Team Prediction

आयपीएल २०२४ चा ६४ वा सामना आज लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आहे. प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी दोन्ही संघांना विजय मिळवावाच लागणार आहे. त्यासाठी आज दोन्ही संघ दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर आमनेसामने येतील. 

दोन्ही संघांचे समान गुण आहेत. पण दिल्लीचा केवळ एक सामना राहिला आहे. तर लखनौचे १२ सामन्यात १२ गुण आहेत. अशा स्थितीत हा सामना खूपच रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, दिल्ली असो की लखनौ, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

विकेटकीपर

शाई होप आणि क्विंटन डी कॉक हे यष्टिरक्षक म्हणून सर्वोत्तम पर्याय असतील. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध झालेल्या सामन्यात होपने २९ धावांची इनिंग खेळली होती. त्याच वेळी, क्विंटन डी कॉकची बॅट बोलली तर तो सामना फिरवू शकतो.

फलंदाज

फलंदाजीमध्ये ट्रिस्टन स्टब्स, आयुष बडोनी आणि जॅक फ्रेझर मॅकगर्क यांचा तुमच्या ड्रीम इलेव्हन संघात समावेश करावा. फ्रेझर या हंगामात धमाकेदार फॉर्ममध्ये दिसला आहे. पॉवरप्लेमध्ये त्याने आपल्या स्फोटक फलंदाजीने चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर फ्रेझर पुन्हा एकदा बॅटने फटकेबाजी करू शकतो. दुसरीकडे, स्टब्सच्या बॅटनेही यंदा चांगली कामगिरी केली आहे.

ऑलराऊंडर

अक्षर पटेल, कृणाल पंड्या आणि मार्कस स्टॉइनिस हे तिन्ही खेळाडू दमदार फॉर्मात आहेत. अक्षरने आरसीबीविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात ३९ चेंडूत ५७ धावांची दमदार खेळी केली. त्याच वेळी, तो चेंडूवर देखील प्रभावी ठरू शकतो. या मोसमात स्टॉइनिसही चांगल्या फॉर्ममध्ये दिसला आहे. कृणाल पांड्यामध्ये बॅट आणि बॉल या दोन्हीत चांगली कामगिरी करण्याची ताकद आहे.

गोलंदाज

गोलंदाजीत तुम्ही कुलदीप यादव, यश ठाकूर, नवीन उल हक यांचा तुमच्या संघात समावेश करू शकता. कुलदीप दिल्ली संघासाठी ट्रम्प कार्ड असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर यश ठाकूरकडे विकेट घेण्याचे कौशल्यही आहे. नवीन उल हक देखील तुम्हाला चांगले गुण देऊ शकतो.

DC vs LSG Dream 11 Team Prediction

यष्टिरक्षक - शाई होम, क्विंटन डी कॉक

फलंदाज - ट्रिस्टन स्टब्स, आयुष बडोनी, जॅक फ्रेझर मॅकगर्क (कर्णधार)

अष्टपैलू - अक्षर पटेल, क्रुणाल पंड्या, मार्कस स्टॉइनिस (उपकर्णधार)

गोलंदाज - कुलदीप यादव, यश ठाकूर, नवीन उल हक

Whats_app_banner

संबंधित बातम्या