मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Raundal: बॉक्स ऑफिसवर मराठमोळ्या 'रौंदळ'ची हवा! प्रेक्षकांच्या तुफान प्रतिसादानंतर हिंदीतही प्रदर्शित होणार!

Raundal: बॉक्स ऑफिसवर मराठमोळ्या 'रौंदळ'ची हवा! प्रेक्षकांच्या तुफान प्रतिसादानंतर हिंदीतही प्रदर्शित होणार!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 09, 2023 01:35 PM IST

Raundal Marathi Movie: 'रौंदळ'ने रिलीजपूर्वीच सर्वांच्या मनात कुतूहल जागवलं होतं. त्यामुळे प्रेक्षकांनी फर्स्ट डे फर्स्ट शोपासूनच 'रौंदळ' पाहण्यासाठी गर्दी केली.

Raundal Marathi Movie
Raundal Marathi Movie

Raundal Marathi Movie: आशयघन चित्रपटांसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या मराठी सिनेसृष्टीमध्ये अ‍ॅक्शन चित्रपटांची तशी वानवाच आहे. आता मात्र ही उणीव भरून काढण्यासाठी एक धडाकेबाज अ‍ॅक्शनपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून कुतूहल जागवणारा 'रौंदळ' हा अ‍ॅक्शनपट मराठीत तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर आता हिंदी प्रेक्षकांचंही मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘रौंदळ’ हा चित्रपट आता हिंदीतही रिलीज होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'रौंदळ'ने रिलीजपूर्वीच सर्वांच्या मनात कुतूहल जागवलं होतं. त्यामुळे प्रेक्षकांनी फर्स्ट डे फर्स्ट शोपासूनच 'रौंदळ' पाहण्यासाठी गर्दी केली. शुक्रवारी चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच झालेलं अ‍ॅडव्हान्स बुकिंग आणि नंतर झालेल्या करंट बुकींगच्या बळावर या चित्रपटानं पहिल्या वीकेंडला चांगला गल्ला जमवत मागील काही दिवसांपासून मराठी चित्रपटांची सुरू असलेली यशस्वी घोडदौड अबाधित राखण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील प्रेक्षक 'रौंदळ'वर अक्षरशः फिदा झाले आहेत.

भाऊसाहेब शिंदेच्या दमदार एंट्रीला टाळ्या-शिट्टयांचा वर्षाव होत आहे. भाऊसाहेब शिंदे आणि नेहा सोनावणे या नव्या कोऱ्या जोडीनं प्रेक्षकांच्या मनावर गारूड केलं आहे. संजय लाकडे, यशराज डिंबाळे, सुरेखा डिंबाळे, शिवराज वाळवेकर, गणेश देशमुख, सागर लोखंडे या कलाकारांनी 'रौंदळ'मध्ये अभिनय केला आहे. वास्तवदर्शी वाटणारी अ‍ॅक्शन दृश्ये लक्ष वेधून घेत आहेत. प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादाच्या बळावर शुक्रवार, शनिवार आणि रविवारी या चित्रपटानं ५ कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय आपल्या नावे केला आहे.

एकूण ३२० सिनेमागृहामध्ये रिलीज झालेला 'रौंदळ' ८९० शोजसह प्रचंड गर्दीत सुरू आहे. बॉक्स ऑफिसवरील यशानंतर आता लवकरच 'रौंदळ' हिंदी भाषेतही प्रदर्शित करण्यात येणार असल्याचं निर्मात्यांनी घोषित केलं आहे. चित्रपटाचं कथानक रसिकांना आपलंसं करत असून, कलाकारांचा अभिनय मनाला भावत आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रियांमुळे इतर प्रेक्षकांची पावलंही 'रौंदळ' पाहण्यासाठी सिनेमागृहाच्या दिशेनं वळत आहेत. 'रौंदळ'मधील गाणी खऱ्या अर्थानं मराठी संगीतरसिकांसोबतच अमराठी संगीतप्रेमींच्या मनातही रुंजी घालू लागली आहेत. नव्या कोऱ्या जोडीची केमिस्ट्री आणि त्यांची लव्हस्टोरी रसिकांचं मन मोहित करत आहे.

IPL_Entry_Point

विभाग