Meera Chopra Wedding Cards: सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. अभिनेत्री रकुल प्रीत सिंह-जॅकी भगनानी, सिद्धार्थ-कियारा, परिणिती-राघव चड्ढा यांच्या पाठोपाठ आता बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राची बहिण मिरा चोप्रा ही लग्न बंधनात अडकणार आहे. मिरा ही रक्षित केजरीवालशी लग्नगाठ बांधणार आहे. त्यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
काही दिवसांपूर्वी प्रियांकाची बहिण, अभिनेत्री परिणिती चोप्राने आद आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा यांच्याशी विवाह केला. त्यापाठोपाठ प्रियांकाची दुसरी बहिण मिरा चोप्रा बॉयफ्रेंड रक्षित केजरीवालशी लग्न करणार आहे. मिरा चोप्रा आणि रक्षित केजरीवाल यांच्या लग्नाच्या पत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये मिरा आणि रक्षित यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्स आणि लग्नाची माहिती आहे.
वाचा: अभिनेत्याची विंटेज कार चोरीला, व्हिडीओ शेअर करत केली परत करण्याची मागणी
मिरा चोप्राच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला ११ मार्चपासून सुरुवात होणार आहे. मीरा आणि रक्षित यांच्या मेहंदी सोहळ्यानंतर संगीत आणि कॉकटेल नाईट असणार आहे. १२ मार्च रोजी दिवसभर हळदी समारंभ होईल आणि त्यानंतर संध्याकाळी मीरा आणि रक्षित यांची वरात असणार आहे. जयपूरमधील कुंडा येथील एका आलिशान हॉटेलमध्ये मिरा आणि रक्षित यांचे लग्न होणार आहे. त्यांच्या लग्नसोहळ्याला काही मोजक्याच लोकांना बोलावण्यात आले आहे. जवळचा मित्रपरिवार आणि कुटुंबीयांना आमंत्रण देण्यात आले आहे.
वाचा: राखी सावंतच्या एक्स-पतीने बांधली लग्नगाठ! पाहा कोण आहे ‘ही’ नवी सुंदरी
प्रियांका चोप्राने निक जोनसशी २०१८मध्ये जोधपूर येथे लग्नगाठ बांधली. त्यापाठोपाठ परिणिती चोप्राने राघव चड्ढाशी उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधली. प्रियांका आणि परिणीतीप्रमाणे मीरा चोप्राही राजस्थानमध्ये लग्न करणार आहे. जयपूरमध्ये ती रक्षितसोबत लग्नगाठ बांधणार आहे.
वाचा: लग्नात नाचताना धर्मेंद्र यांना दुखापत; दोन आठवड्यांपासून प्रकृती खालावली
प्रियांका आणि परिणिती प्रमाणे मिरा देखील एक अभिनेत्री आहे. तिने 'अंबे आरुयरे' या तमिळ चित्रपटातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर तिने '१९२० लंडन', 'सफेद', 'सेक्शन ३७५' आणि 'गँग ऑफ घोस्ट' या चित्रपटांमध्ये काम केले. मिरा ही सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ती नेटकऱ्यांसोबत सतत फोटो शेअर करताना दिसते. तिचे ५०७ के फॉलोअर्स आहेत.
संबंधित बातम्या