मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Dharmendra: लग्नात नाचताना धर्मेंद्र यांना दुखापत; दोन आठवड्यांपासून प्रकृती खालावली

Dharmendra: लग्नात नाचताना धर्मेंद्र यांना दुखापत; दोन आठवड्यांपासून प्रकृती खालावली

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 07, 2024 03:19 PM IST

Dharmendra Health Update: गेल्या दोन आठवड्यांपासून धर्मेंद्र यांची प्रकृती ठिक नाही. आता त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती समोर आली आहे.

Dharmendra
Dharmendra

Dharmendra health: गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे चर्चेत आहेत. वयाच्या ८८व्या वर्षी देखील सिनेसृष्टीमध्ये कार्यरत असलेले धर्मेंद्र हे सोशल मीडियावर देखील सक्रिय असतात. त्यांचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. त्यांनी केलेली प्रत्येक पोस्ट ही चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. धर्मेंद्र यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठिक दिसत नाही. आता त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती समोर आली आहे. नेमकं धर्मेंद्र यांना काय झाले याची देखील अपडेट आली आहे.

‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, धर्मेंद्र हे उदयपूरला एका लग्नसोहळ्यासाठी गेले होते. या लग्नात नाचताना त्यांच्या पाठीला आणि पायाला दुखापत झाली. आता त्यांची प्रकृती पहिल्यापेक्षा चांगली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आता आनंदाचे वातावरण दिसत आहे. धर्मेंद्र हे पूर्णपणे बरे व्हावेत यासाठी ते प्रार्थना करत आहेत.
वाचा: चला हवा येऊ द्यामधून कुशल बद्रिकेची एग्झिट? अभिनेत्याने सांगितले सत्य

यापूर्वी रविवारी धर्मेंद्र यांनी केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले होते. या पोस्टमध्ये त्यांनी एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ते एका झाडा खाली उभे असून अतिशय तरुण दिसत आहेत. पाठीमागे दोन अभिनेत्री दिसत आहेत. पण या अभिनेत्री कोण आहेत? हे स्पष्ट होत नाही. हा फोटो शेअर करत धर्मेंद्र यांनी 'अच्छा तो हम चलते हैं' असे कॅप्शन दिले होते. त्यांच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले होते.
वाचा: कुठला चित्रपट जिंकणार ऑस्कर, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाता येणार पुरस्कार सोहळा

अभिनेते धर्मेंद्र यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज वयाच्या ८८ व्या वर्षी देखील धर्मेंद्र मोठ्या पडद्यावर सक्रिय आहे. धर्मेंद्र यांच्या चाहत्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. एवढंच नाही तर, त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात.
वाचा: सनी लिओनीला मराठी गाण्याची भूरळ, 'नवरोबा'वर डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल

धर्मेंद्र यांच्या कामाविषयी

धर्मेंद्र त्यांच्या कामासंबंधी बोलायचे झाले तर, अभिनेते 'अपने २' चित्रपटात दिसणार आहेत. याआधी त्यांनी 'तेरी बातो में उलझा जिया' या चित्रपटात त्यांनी काम केले. या चित्रपटात त्यांचा अभिनयाचे फार कौतुक झाले. तसेच 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटातील त्यांच्या किसिंग सीनची भलतीच चर्चा रंगली होती.

IPL_Entry_Point

विभाग