Karan Kundra Vintage Car is Missing: बॉलिवूड कलाकार हे त्यांच्या लग्झरी लाइफसाठी विशेष ओळखले जातात. प्रत्येक कलाकाराकडे लग्झरी गाड्या असतात. नुकताच बॉलिवूड अभिनेता करण कुंद्राची विटेंज कार चोरीला गेल्याची बातमी समोर आली आहे. सोशल मीडियावर करणने याबाबत व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच ती गाडी कोणी घेतली असल्यास परत करण्याची मागणी देखील केली आहे.
बुधवारी ६ मार्च रोजी करणने विटेंज कार खरेदी केली. ही हिंदुस्तानी मोटर्स कंटेसा गाडी आहे. या गाडीसोबत करणने काही फोटो शेअर काढले आणि सोशल मीडियावर शेअर केले. ही गाडी खरेदी केल्याच्या दुसऱ्याच दिवशी कोणी तरी ती चोरली आहे. ही गाडी खरच कोणी चोरली आहे की कोणत्या मित्राने करणसोबत प्रँक केला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. करणने ही गाडी परत करण्याची विनंती केली आहे.
वाचा: गृहमंत्री अमित शहांच्या फर्माईशवर आशा भोसलेंनी गायलं 'अभी ना जाओ छोडकर..' गाणं
गाडी गायब झाल्यामुळे करण कुंद्राला टेंशन आले आहे. त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो बोलत आहे की, 'जर कोणी माझी गाडी लपवली असेल किंवा प्रँक केला असेल तर कृपया ती परत करा. माझी ती नवीन गाडी आहे. हा मी सेकंड हँड खरेदी केली आहे. पण मी ती गाडी फार चावलेली देखील नाही. गाडीमध्ये कोणता कॅमेरा नाही, सिक्योरिटी सिस्टम नाही जेणे करुन ट्रॅक करता येईल. हा मजेशीर प्रँक नाही. प्लीज मला माझी गाडी परत करा.' व्हिडीओमध्ये करण एकदम नाराज दिसत आहे.
वाचा: अंबानींच्या कार्यक्रमाला कंगना गैरहजर, काय आहे कारण?
करणने ६ मार्च रोजी विंटेज कार खरेदी केली. त्याने ही कार थोडा वेळ चालवली देखील. कारसोबतचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले. काही वेळातच त्याची ही गाडी गायब झाली. नेमके प्रकरण काय आहे हे अद्याप समोर आलेले नाही. लवकरच याबाबत माहिती समोर येणार आहे.
वाचा: सनी लिओनीला मराठी गाण्याची भूरळ, 'नवरोबा'वर डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल
करण कुंद्रा बिग बॉस १५ या रिअॅलिटी शोमध्ये दिसला होता. त्याचवेळी त्याची ओळख तेजस्विनी प्रकाशशी झाली. बिग बॉसच्या घरातच त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली होती. तेव्हा पासून ते दोघे एकमेकांना डेट करत आहे. त्यापूर्वी करण अनुषा दांडेकरला डेट करत होता. त्यांचा लव्हस्कूल हा एमटीव्हीवरचा शो विशेष गाजला होता. पण या शो दरम्यानच त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर करण आणि तेजस्विनी एकमेकांना डेट करत आहेत.