Adil Khan Durrani Second Wife: बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. आता राखी तिच्या पूर्व-पती आदिल खान दुर्राणी यांच्यामुळे चर्चेत आली आहे. आदिल खान दुर्राणी याने आता लग्नगाठ बांधल्याचे समोर आले आहे. राखीच नाही तर, तिचा माजी पती आदिल खान दुर्राणी देखील प्रसिद्धी झोतात असतो. आदिल देखील असे काहीतरी करत असतो, ज्यामुळे त्याला प्रसिद्धी मिळते. सध्या आदिल खान दुर्राणी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. मात्र, यावेळी हे प्रकरण राखी सावंतशी संबंधित नाही.
‘ई टाईम्स’च्या एका रिपोर्टनुसार, असा दावा करण्यात आला आहे की आदिल खान दुर्राणीने ‘बिग बॉस १२’ची स्पर्धक सोमी खानसोबत लग्न केले आहे. त्याचे हे लग्न अतिशय खाजगी पद्धतीने पार पडले आहे. आदिलच्या बाजूने अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, राखी सावंतच्या माजी पतीने सबा खानची बहीण सोमी खानशी दुसरं लग्न केल्याचे कळते आहे.
आदिल खान दुर्राणीची दुसरी पत्नी सोमी खान ही सबा खानची बहीण आहे. सोमी एक टीव्ही अभिनेत्री देखील आहे. याशिवाय सोमी ‘बिग बॉस १२’ची स्पर्धकही होती. याशिवाय सोमीने 'हमारा हिंदुस्तान', 'न्याय: द जस्टिस' आणि 'केसरिया बालम' सारख्या अनेक टीव्ही शोमध्येही काम केले आहे. सोमी आणि आदिल यांच्या या लग्नाबद्दल बोलायचे झाले तर, आदिल दुर्राणी याच्या एका जवळच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोघांचे लग्न घाईघाईत पार पडले आहे. हे नवविवाहित जोडपे आपल्या लग्नाबद्दल कुणालाही काही सांगू इच्छित नाहीय. त्यांना हे लग्न गुपित ठेवायचे आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या काही दिवसांत जे काही घडले आहे, त्यामुळेच आदिल आणि सोमी दोघांनाही त्यांचे लग्न सिक्रेट ठेवायचे आहे. मात्र, अद्याप सोमी किंवा आदिल या दोघांनीही यावर काहीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
‘बिग बॉस’च्या १२व्या सीझनमध्ये सोमी आणि दीपक ठाकूर त्यांच्या वादांमुळे चर्चेत आले होते. सोमी आणि आदिलच्या लग्नाबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. राखी सावंतपासून विभक्त झाल्यानंतर आदिल दुर्राणी खान याने अभिनेत्रीवर अनेक धक्कादायक आरोप केले होते. तर, राखी सावंत हिने प्रत्येक वेळी पुराव्यांसह आदिलच्या आरोपांचे खंडन करण्याचा प्रयत्न केला होता.
संबंधित बातम्या