मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  लीलाने हरवली अंतराची अंगठी! आता अभिराम काय करणार? ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये येणार नवा ट्वीस्ट

लीलाने हरवली अंतराची अंगठी! आता अभिराम काय करणार? ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये येणार नवा ट्वीस्ट

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 22, 2024 05:08 PM IST

अंगठी हरवल्यामुळे आता अंकल आपल्याला ओरडणार या भीतीने लीलाची घाबरगुंडी उडाली आहे. मात्र, ठरल्या प्रमाणे साखरपुडाच्या वेळेत लीलाला अभिरामच्या घरी पोहोचावं लागणार आहे.

लीलाने हरवली अंतराची अंगठी! आता अभिराम काय करणार? ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये येणार नवा ट्वीस्ट
लीलाने हरवली अंतराची अंगठी! आता अभिराम काय करणार? ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये येणार नवा ट्वीस्ट

नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेच्या आजच्या भागात अभिराम आणि लीला यांचा साखरपुडा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या साखरपुड्यात आता मोठा गोंधळ निर्माण होणार आहे. अंतराची अंगठी लीलाने हरवली आहे. मात्र, अंतराची अंगठी हरवण्यामागे लीलाचा काहीच दोष नसून, अभिरामच्या सुना म्हणजेच लक्ष्मी आणि सरस्वती यांनी अतिशय चालाखीने लीला कडून ती अंगठी हिसकावून घेतली आहे. आपल्या जिवापेक्षा जास्त अंगठीला जपणाऱ्या लीलाला अंगठी हरवली आहे, हे कळल्यानंतर मोठा धक्का बसला आहे. अंगठी हरवल्यामुळे आता अंकल आपल्याला ओरडणार या भीतीने लीलाची घाबरगुंडी उडाली आहे. मात्र, ठरल्या प्रमाणे साखरपुडाच्या वेळेत लीलाला अभिरामच्या घरी पोहोचावं लागणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

एकीकडे सरस्वती आणि लक्ष्मी यांनी लीलाकडून ती अंगठी चोरून घरी तर आणली, मात्र त्यांच्याही धसमुसळ्या स्वभावामुळे ती अंगठी हारांच्या ताटात पडली आणि ते हार आता जहागीरदारांच्या देवघरातील देवाला घालण्यात आला आहे. गणपती बाप्पाच्या गळ्यात घालण्यात आलेल्या फुलांच्या हारांमध्येच अंतराची ही अंगठी अडकली आहे. लीलाला मात्र याबद्दल काहीच कल्पना नाही.

चैतन्यसोबत साक्षीही पोहोचली अर्जुन-सायलीच्या घरात! ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये होणार मोठा राडा!

लक्ष्मी आणि सरस्वतीने संधी साधली!

साडी आणि दागिने दाखवण्याच्या बहाण्याने घरी आलेल्या लक्ष्मी आणि सरस्वतीने लीलाला इतका त्रास दिला की, तिने हातातली अंगठी चुकून खाली ठेवली. लीलाने ती अंगठी खाली ठेवताच लक्ष्मीने उचलून स्वतःच्या पर्समध्ये ठेवली. मात्र, लीलाला याबद्दल कल्पना देखील आली नाही. अंगठी बॉक्समध्येच आहे या विचाराने लीला आपली काम करताना तो बॉक्स सांभाळत राहिली. मात्र, अभिरामचा फोन आल्यावर जेव्हा अंगठी दाखवण्यासाठी लीलाने बॉक्स उघडला, तेव्हा त्यात अंगठी नसल्याचे तिला कळले. अंगठी हरवली हे कळल्यानंतर आता लीलाची घाबरगुंडी उडाली आहे. मात्र, ‘तू काहीच बोलू नको, मी जे बोलेन त्या होला हो कर’, असं म्हणत कालिंदीने साखरपुड्याची सगळी तयारी करून लीला आणि कुटुंबासह अभिरामचं घर गाठलं आहे.

आता अभिराम काय करणार?

आता साखरपुड्याच्या प्रसंगी अंगठी काढून ताटात ठेवताना बॉक्समध्ये अंतराची अंगठी पाहून लीला हायसं वाटलं आहे. मात्र, पहिल्याच नजरेत अभिरामने ओळखले की, ही अंगठी खरी नसून, खोटी आहे. यावेळी अभिराम लीलाला बोलणार आहे की, ‘ही माझ्या अंतराची अंगठी नाही, ही खोटी अंगठी आहे. माझ्या अंतराची अंगठी कुठे आहे, तू आत्ताच्या आता सांग.’ मात्र, लीलाला त्याची काहीच कल्पना नसल्याने ती आता गप्प राहण्याचा प्रयत्न करणार आहे. लीलाने अंतराची खरी अंगठी हरवली आहे, हे कळल्यानंतर आता अभिराम पुढे काय करणार, हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

IPL_Entry_Point