मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Moushumi Chatterjee Birthday: इमोशनल सीनमध्ये खरोखरच रडायच्या मौसमी चॅटर्जी! अभिनेत्रीबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत?

Moushumi Chatterjee Birthday: इमोशनल सीनमध्ये खरोखरच रडायच्या मौसमी चॅटर्जी! अभिनेत्रीबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 26, 2023 12:23 PM IST

Happy Birthday Moushumi Chatterjee: अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांचा अभिनय इतका दमदार होता की, त्यांना एखाद्या सीनमध्ये रडण्यासाठी ग्लिसरीनची देखील गरज भासत नव्हती.

Moushumi Chatterjee
Moushumi Chatterjee

Happy Birthday Moushumi Chatterjee: बॉलिवूडमध्ये ६०-७०चे दशक गाजवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये मौसमी चॅटर्जी यांचे नाव आवर्जून घेतले जाते. त्यांनी केवळ हिंदी चित्रपटसृष्टीतच नाही तर, आपल्या दमदार अभिनयाने बंगाली चित्रपटसृष्टीतही आपली अमीट छाप सोडली. १९६७मध्ये त्यांनी 'बालिका वधू' या बंगाली चित्रपटातून अभिनय विश्वात प्रवेश केला होता. मौसमी चॅटर्जीचा यांचा जन्म २६ एप्रिल १९४८ रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे वडील सैन्यात होते. लहान वयातच मौसमी यांचे लग्न जयंत मुखर्जी यांच्याशी फार लहान वयात झाले होते. विशेष म्हणजे त्यांनी लग्नानंतर आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

ट्रेंडिंग न्यूज

मौसमी यांनी दहावीत शिकत असतानाच लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर करिअर करणे आणि तेही चित्रपटसृष्टीत हा त्याकाळात तसा धाडसी निर्णयच होता. मात्र, या निर्णयात त्यांच्या पतीने त्यांना खंबीर साथ दिली. १९७२मध्ये मौसमी यांनी हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केले. ‘अनुराग’ हे त्यांच्या पहिल्या चित्रपटाचे नाव होते. यानंतर त्यांनी अनेक मोठ्या स्टार्ससोबत स्क्रीन स्पेस शेअर केली. 'अंगूर', 'मंझिल' आणि 'रोटी कपडा और मकान' या सारख्या दमदार चित्रपटांमध्ये त्या झळकल्या होत्या. राजेश खन्ना, संजीव कुमार आणि विनोद मेहरा अशा अनेक बड्या स्टार्ससोबत त्यांनी स्क्रीन शेअर केली.

Jawan : हायकोर्टाकडून शाहरुखला मोठा दिलासा; ‘जवान’च्या प्रदर्शनातील अडथळा झाला दूर!

अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांचा अभिनय इतका दमदार होता की, त्यांना एखाद्या सीनमध्ये रडण्यासाठी ग्लिसरीनची देखील गरज भासत नव्हती. ग्लिसरीन न लावताच त्या इमोशनल सीन्स देत असत. याचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने एका मुलाखतीत केला होता. यावेळी त्या म्हणाल्या होत्या की, इमोशनल सीनमध्ये ग्लिसरीनशिवाय सहज रडू यायचे, कारण त्या नेहमीच कथेत गुंतून जात असत. कोणतीही भूमिका असो, त्या प्रत्येक भूमिकेत एकरूप होऊन जायच्या. त्यामुळेच त्यांना कधीही ग्लिसरीनची गरज भासली नाही.

एकीकडे दमदार चित्रपट देत असतानाच त्यांच्या आयुष्यात मातृत्वाचा आनंद आला. अशावेळी त्यांनी मनोरंजन विश्वातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. १९७४मध्ये प्रदर्शित 'रोटी कपडा और मकान' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मौसमी चॅटर्जी आई झाल्या. करिअर यशाच्या शिखरावर असताना एका मुलीला जन्म दिला. आई झाल्यानंतर हळूहळू ही अभिनेत्री चित्रपटांपासून दूर गेली. यानंतर मौसमी चॅटर्जी आपल्या संसारात रमल्या. मात्र, २०१९मध्ये त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. या दरम्यानच्या काळात त्या नैराश्यात गेल्या होत्या.

IPL_Entry_Point

विभाग