मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Jawan : हायकोर्टाकडून शाहरुखला मोठा दिलासा; ‘जवान’च्या प्रदर्शनातील अडथळा झाला दूर!

Jawan : हायकोर्टाकडून शाहरुखला मोठा दिलासा; ‘जवान’च्या प्रदर्शनातील अडथळा झाला दूर!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 26, 2023 11:43 AM IST

Jawan Movie Leaked Video: ‘जवान’ चित्रपटाच्या शूटिंगमधील काही व्हिडीओ क्लिप सोशल प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाल्यामुळे त्याच्या टीमला मोठा धक्का बसला आहे.

Jawan
Jawan

Jawan Movie Leaked Video: नव्या वर्षाच्या सुरुवातीला 'पठाण' या चित्रपटातून शाहरुख खानने सर्वांची मनं जिंकली होती. यानंतर याच वर्षात आणखी एक चित्रपट रिलीज करून शाहरुख धमाका करणार आहे. या वर्षाच्या मध्यात त्याचा दुसरा चित्रपट 'जवान' रिलीज होणार होता. पण, त्याचवेळी चित्रपटाच्या शूटिंगमधील काही व्हिडीओ क्लिप सोशल प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाल्यामुळे त्याच्या टीमला मोठा धक्का बसला. या प्रकरणानंतर रेड चिलीज एंटरटेनमेंटने दिल्ली उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. आता याप्रकरणी शाहरुखला दिलासा देत न्यायालयाने लीक झालेल्या क्लिप सोशल प्लॅटफॉर्मवरून हटवण्याचे आदेश दिले आहेत.

'जवान'च्या लीक झालेल्या क्लिपच्या प्रकरणावर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी या क्लिप सोशल मीडियावरून काढून टाकण्याचे निर्देश दिले. कोर्टाने केबल टीव्ही प्लॅटफॉर्म, डायरेक्ट टू होम, वेबसाइट्स तसेच 'जॉन डो' यांना 'जवान'च्या कॉपीराईटचे उल्लंघन करण्यापासून रोखले. शाहरुख आणि गौरीच्या प्रोडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यावर न्यायमूर्ती सी हरिशंकर यांनी ही लीक क्लिप काढून टाकण्याचे आदेश दिले. न्यायालयाने सर्व सोशल प्लॅटफॉर्मना कठोर पावले उचलण्यास आणि 'जवान'च्या कॉपीराईट केलेल्या सामग्रीचा प्रसार रोखण्यासाठी कठोर पाऊल उचलण्यास सांगितले आहे.

Aryan Khan: आर्यन बनला ‘पापा’ शाहरुख खानचा दिग्दर्शक; टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता!

'जवान' चित्रपटाचे दोन व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर लीक झाले होते. एका क्लिपमध्ये शाहरुखचा फाईट सीक्वेन्स होता, तर दुसऱ्या क्लिपमध्ये मुख्य अभिनेत्री नयनतारा शाहरुखसोबत दिसत होती. कोर्टाच्या आदेशामुळे सध्या शाहरुख आणि त्याच्या टीमला दिलासा मिळाला आहे. ‘जवान’ हा चित्रपट दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली दिग्दर्शित करत आहेत. या चित्रपटात शाहरुखसोबत नयनतारा आणि विजय सेतुपती दिसणार आहेत. याशिवाय थलापती विजय आणि अल्लू अर्जुनचा कॅमिओ देखील पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटाचे व्हिडीओ लीक झाल्यानंतर 'जवान'चे प्रदर्शन पुढे ढकलण्यात येणार असल्याचे म्हटले जात होते. पण बॉलिवूड हंगामाच्या बातमीनुसार, चित्रपट पुढे ढकलण्यात आलेला नाही आणि तो त्याच्या नियोजित तारखेला म्हणजेच २ जून रोजी प्रदर्शित होईल. यासोबतच चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात येणार आहे. शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाचा प्रोमो मी महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग