Kushi OTT Release Deatails: साऊथ अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता विजय देवरकोंडा स्टारर चित्रपट ‘कुशी’ थिएटरमध्ये फारशी जादू दाखवू शकला नाही. ‘जवान’च्या वादळात हा चित्रपट झाकोळला गेला. मात्र, आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट केव्हा आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल, हे निर्मात्यांनी जाहीर केले आहे. समंथा आणि विजयची अनोखी प्रेमकथा आता घर बसल्या पाहता येणार आहे. जाणून घ्या कधी आणि कुठे बघता येणार हा चित्रपट...
समंथा आणि विजय यांचा 'कुशी' हा चित्रपट १ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. आता महिनाभरानंतर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीजसाठी सज्ज झाला आहे. विजय आणि समंथाची अनोखी प्रेमकथा जर तुम्हाला थिएटरमध्ये बघता आला नसेल, तर तो तुम्ही ओटीटीवर पाहू शकता. आता हा चित्रपट कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार हे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.
शिव निर्वाण दिग्दर्शित 'कुशी' चित्रपटगृहांतून प्रदर्शित होऊन महिनाही उलटला नाहीये. परंतु, आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. विजय-समंथाचा हा चित्रपट १ ऑक्टोबर रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. समंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा यांच्या 'कुशी' या चित्रपटाचे हक्क ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने विकत घेतले आहेत. त्यामुळे येत्या वीकेंडला नेटकऱ्यांना घरबसल्या या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे. 'कुशी' हा चित्रपट तेलगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषेत रिलीज होणार आहे.
समंथा आणि विजय स्टारर 'कुशी' या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच खूप चर्चा झाली होती. मात्र, जी जादू अपेक्षित होती ती चित्रपटगृहांमध्ये पाहायला मिळाली नाही. चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये चांगली कमाई केली होती. परंतु, आठवड्याच्या काहीच दिवसांत तो फ्लॉप झाला. आता ओटीटीवर या चित्रपटाला प्रेक्षक किती प्रतिसाद देतील याकडे बघावे लागणार आहे. 'कुशी' हा विप्लव आणि आराध्या यांची प्रेमकथा सांगणारा चित्रपट आहे. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात, परंतु कुटुंबातील भिन्न विचार त्यांच्या नात्यात मोठा अडथळा बनतात.
संबंधित बातम्या