मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Parineeti-Raghav Wedding: नववधू प्रिया मी बावरले... लग्नानंतर परिणीती-राघवचा पहिलावाहिला फोटो पाहिलात का?

Parineeti-Raghav Wedding: नववधू प्रिया मी बावरले... लग्नानंतर परिणीती-राघवचा पहिलावाहिला फोटो पाहिलात का?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Sep 25, 2023 08:50 AM IST

Parineeti Chopra And Raghav Chadha Wedding: परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी एका ग्रँड वेडिंग रिसेप्शनचे आयोजन केलं होतं. आता या रिसेप्शन पार्टीतील नव्या जोडप्याचा एक फोटो समोर आला आहे.

Parineeti-Raghav Wedding Photo
Parineeti-Raghav Wedding Photo

Parineeti-Raghav Wedding Photo: हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राजकारणातील प्रसिद्ध नेते राघव चढ्ढा यांनी सात फेरे घेऊन एकमेकांशी विवाह केला आहे. दोघांचा हा लग्न सोहळा गेल्या अनेक दिवसांपासून चार्चीते होता. या दोघांचा लग्नानंतरचा पहिला फोटो समोर आला आहे. परिणीती चोप्रा आणि राघव २४ सप्टेंबर रोजी उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये विवाहबद्ध झाले. या दोघांनी हिंदू रितीरिवाजाप्रमाणे चार वाजताच्या मुहूर्तावर सात फेरे घेतले. 'ताज लेक पॅलेस'मधून राघव वरात घेऊन 'द लीला पॅलेस' येथे पोहोचला. ६.३० वाजता परिणीतीचा बिदाई सोहळा पार पडला.

ट्रेंडिंग न्यूज

लग्न सोहळ्यानंतर परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी एका ग्रँड वेडिंग रिसेप्शनचे आयोजन केलं होतं. आता या रिसेप्शन पार्टीतील नव्या जोडप्याचा एक फोटो समोर आला आहे. बेबी पिंक रंगाच्या साडीत परिणीती खूपच सुंदर दिसत आहे. दरम्यान, राघवही काळ्या रंगाच्या टक्सिडोमध्ये राजबिंडा दिसत आहे. परिणीतीने तिचा रिसेप्शन लूक केपस्टाईल ब्लाऊजसह पारदर्शक साडीने स्टाईल केला. कानातले आणि गुलाबी बांगड्यांसह मोत्यांचे भारी दागिने यामुळे तिचा एकूणच लूक आकर्षक झाला आहे.

Vaibhav Tatwawadi Birthday: इंजिनिअर झालेला वैभव तत्ववादी अभिनयाकडे कसा वळला? वाचा त्याच्या या प्रवासाबद्दल...

यासोबत हलका मेकअप आणि मोकळ्या केसांमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. परिणीतीच्या सिंदूरने तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आणली आहे. नवविवाहित वधू परिणीती तिच्या रिसेप्शन पार्टीत सुंदर दिसत होती. परिणीती आणि राघवच्या लग्नाला सानिया मिर्झा, अनम मिर्झा, मनीष मल्होत्रा, हरभजन सिंह, गीता बसरा, आदित्य ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि आपचे खासदार संजय सिंह यांच्यासह बॉलिवूड आणि राजकारणातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी हजेरी लावली होती.

परिणीती आणि राघवच्या लग्नाच्या मेनू लिस्टमध्ये देशभरातील विविध राज्यांतील प्रसिद्ध पदार्थांचा समावेश होता. राजस्थानी आणि पंजाबी पदार्थांव्यतिरिक्त इतर राज्यातील पदार्थ पाहुण्यांना सर्व्ह करण्यात आले होते. इतकेच नाही तर, त्यांच्या जेवणात इटालियन आणि फ्रेंच पदार्थांचाही समावेश करण्यात आला होता. परिणीती आणि राघव कॉलेजपासून एकमेकांचे मित्र होते. गेल्या एक वर्षापासून ते दोघे एकमेकांना डेट करत होते. आता त्यांनी लग्न केले आहे.

IPL_Entry_Point