मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  KBC 15: शेवटच्या भागात अमिताभ बच्चन यांनी विचारला हेलनबद्दल प्रश्न! तुम्हाला माहितीये का उत्तर?

KBC 15: शेवटच्या भागात अमिताभ बच्चन यांनी विचारला हेलनबद्दल प्रश्न! तुम्हाला माहितीये का उत्तर?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 30, 2023 07:55 AM IST

Kaun Banega Crorepati 15 Final Episode:स्पर्धक ललित कुमार यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर अमिताभ यांनी या प्रश्नाचे योग्य उत्तर सांगितले. या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी एक किस्सा देखील सांगितला.

Kaun Banega Crorepati 15
Kaun Banega Crorepati 15

Kaun Banega Crorepati 15 Final Episode: छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय टीव्ही शो 'कौन बनेगा करोडपती सीझन १५'च्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागामध्ये अमिताभ बच्चन यांनी हॉटसीटवर बसलेल्या एका स्पर्धकाला हेलनशी संबंधित प्रश्न विचारला होता, जो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धक ललित कुमार यांना अमिताभ बच्चन यांनी २५ लाख रुपयांसाठी हा प्रश्न विचारला होता. मात्र, स्पर्धक ललित याला प्रश्नाचं उत्तर न आल्याने त्याने खेळ अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला.

ट्रेंडिंग न्यूज

अमिताभ बच्चन यांनी अभिनेत्री हेलनशी संबंधित प्रश्न २५ लाख रुपयांसाठी विचारला होता. २५ लाखांसाठीचा हा प्रश्न होता, 'कोणत्या अभिनेत्रीचा जन्म म्यानमारमध्ये झाला होता आणि दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान त्यांनी कुटुंबासह भारतात देश गाठला होता?' या प्रश्नाचे पर्याय होत, (ए) सुलोचना, (बी) सुरैया, (३) हेलन आणि (४) नादिरा होत्या. मात्र, या प्रश्नाचे उत्तर ललित कुमार यांना माहीत नव्हते. त्यामुळे त्यांनी कोणताही धोका न पत्करता खेळ सोडणे योग्य समजले. ललित कुमार १२.५० लाख रुपयांची बक्षीस रक्कम घेऊन घरी परतले.

Tharala Tar Mag 29th Dec: पहिल्यांदाच होणार प्रेमाचं भांडण! चिडलेली सायली अर्जुनला म्हणणार...

स्पर्धक ललित कुमार यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर अमिताभ यांनी या प्रश्नाचे योग्य उत्तर सांगितले. या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी एक किस्सा देखील सांगितला. हा किस्सा सांगताना अमिताभ बच्चन म्हणाले, ‘हेलन आणि तिचे कुटुंब म्यानमारमधून पळून गेले होते. या भागाला पूर्वी बर्मा म्हणून ओळखले जात होते. त्यासाठी त्यांना अनेक डोंगर, झाडी, नद्या पार कराव्या लागल्या. १९४३मध्ये बर्मावर असलेल्या जपानी ताब्यातून स्वतःची सुटका करण्यासाठी त्यांना हे करावे लागले होते. पुढे त्या आपल्या फिल्म इंडस्ट्रीच्या लोकप्रिय अभिनेत्री बनल्या.’

गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या 'कौन बनेगा करोडपती'च्या १५व्या सीझननेही प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. काल म्हणजेच २९ डिसेंबरला या शोचा शेवटचा भाग प्रसारित झालं. गेल्या २३ वर्षांपासून या शोशी नातं जोडलेले अमिताभ बच्चन यावेळी पुन्हा एकदा भावुक झालेले दिसले. या सीझनच्या शेवटच्या एपिसोडमध्ये त्यांनी साश्रू नयनांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला.

IPL_Entry_Point