Tharala Tar Mag 29th December 2023 Serial Update: सायली आणि अर्जुनमध्ये आता प्रेम फुलताना बघायला मिळणार आहे. अर्जुन तर केव्हाच सायलीच्या प्रेमात पडला होता. मात्र, आता सायलीच्या मनात देखील प्रेमाचा अंकुर फुटू लागणार आहे. अर्जुनला पोलिसांचा मार खाताना बघून सायलीच्या मनातील प्रेमभाव जागा होणार आहे. अर्जुनने इतका मोठा धोका का पत्करला असावा? असा प्रश्न सायलीला सतत त्रास देत आहे. आता ती चिडून अर्जुनला या बद्दल विचारणार आहे. सायलीला असं चिडलेलं पाहून अर्जुन देखील घाबरून जाणार आहे.
आश्रमात घडलेल्या विलासच्या खुनाच्या घटनेमुळे मधुभाऊ तुरुंगात गेले आहेत. विलासच्या खुनाचा खोटा आरोप मधुभाऊंवर आला आहे. याच खुनाच्या आरोपातून मधुभाऊंना सोडवण्यासाठी सायली आणि अर्जुन अनेक प्रयत्न करत आहेत. मधुभाऊंच्या आश्रमात या केस संबंधित काहीतरी पुरावा नक्कीच सापडेल, या विचारांनी सायली आणि अर्जुन यांनी आश्रम गाठलेलं असतं. विलासच्या खुनानंतर पोलिसांनी या आश्रमाला टाळा लावला होता. कुणीही पोलिसांच्या परवानगीशिवाय या आश्रमात जाऊ नये, असा आदेश देखील तिथे लावण्यात आला होता. मात्र, तरी सायली आणि अर्जुन कुणाचीही परवानगी न घेता आश्रमात गेले होते.
यावेळी सायली आणि अर्जुन पुरावे शोधात असतानाच तिथे पोलिसांची एंट्री होते. पोलिसांना पाहून सायली आणि अर्जुन गवताच्या मागे लपतात. मात्र, पोलिसांना संशय आल्याने ते गवताच्या पेंढ्यावर काठीने जोरात मारतात. पोलिसांचा हा मार सायलीला लागणार तितक्या अर्जुन तिला ढकलतो आणि त्याला मार बसतो. मात्र, यातून दोघेही कसाबसा पळ काढून घरी परतात. अर्जुनला लागलेला मार पाहून सायलीला खूप वाईट वाटतंय. अर्जुनने इतका मोठा धोका का पत्करला, असा प्रश्नही तिला पडला आहे. ती हाच प्रश्न आता अर्जुनला चिडून विचारणार आहे. तर, सायलीचा रुद्र अवतार पाहून अर्जुन देखील खरं कारण सांगून टाकणार आहे.
पुरावे शोधण्यासोबतच आपण तुझ्या खऱ्या आई-वडिलांबद्दलही काही माहिती मिळते का ते शोधात होतो, असे अर्जुन सायलीला सांगणार आहे. मालिकेच्या पुढील भागात दोघांमधील हे प्रेम आणि काळजीचं भांडण पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या