मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sapan: कॅनडाचा सीए भारतात आला अन् अभिनेता झाला; जिगरच्या 'सपान' गाण्याची सोशल मीडियावर हवा!

Sapan: कॅनडाचा सीए भारतात आला अन् अभिनेता झाला; जिगरच्या 'सपान' गाण्याची सोशल मीडियावर हवा!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 21, 2023 06:12 PM IST

Sapan Marathi Song: पेशाने सीए असणारा जिगर अभिनयापोटी आणि मराठी गाण्यांच्या प्रेमापोटी थेट कॅनडाहून भारतात आला.

Sapan Marathi Song
Sapan Marathi Song

Sapan Marathi Song: प्रेम म्हणजे प्रेम असतं.. तुमचं आमचं सेम असतं असं कवीने म्हटलं आहेच. पण, सध्या याच प्रेमाच्या व्याख्या सतत बदलताना दिसतात. प्रेम आणि प्रेमाने प्रेमावर वाटणारा विश्वास, मनातल्या भावना व्यक्त करणं अलीकडे किती सोप्पं झालंय ना... या वाक्यासाठी अतिशय योग्य उदाहरण म्हणून एक नवं कोर गाणं प्रेमीयुगुलांच्या दिलाचा ठोका चुकवायला सज्ज झाले आहे. दिग्दर्शक सचिन रामचंद्र आंबात दिग्दर्शित आणि 'स्वप्न स्वरूप' निर्मित ‘सपान’ या गाण्यात अभिनेता जिगर मुकेश शाह आणि अभिनेत्री दिव्या गुप्ता ही जोडी पाहायला मिळतेय.

ट्रेंडिंग न्यूज

ब्रह्मचारी म्हणून आयुष्यभर राहणार असा प्रण घेतलेला तरुण युवक त्याच्या आयुष्यात एक सुंदर मुलगी येताच घेतलेले प्रण कसे विसरतो आणि त्या मुलीच्या प्रेमात बेधुंद होऊन कसे रमतो याचे हुबेहूब वर्णन करणारे 'सपान' हे रोमँटिक गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. या गाण्यात जिगर आणि दिव्याचा रोमँटिक अंदाज पाहणं रंजक ठरणार आहे.

गावरान प्रेमगीत असलेल्या या गाण्यात जिगरचे करावे तितके कौतुक कमीच. पेशाने सीए असणारा जिगर अभिनयापोटी आणि मराठी गाण्यांच्या प्रेमापोटी थेट कॅनडाहून भारतात आला. सीए होण्यासोबतच त्याने अभिनेता होण्याचे इतकी वर्ष उराशी बाळगून ठेवलेले स्वप्नही तो पूर्ण करण्यात यशस्वी झाला आहे. या गावरान प्रेमगीताला आपल्या सर्वांचा लाडका गायक म्हणजेच केवल वालंज याने त्याचा सुमधुर स्वर दिला आहे. तर मराठी गाणी आणि चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक सचिन रामचंद्र आंबात यांनी या गाण्याच्या लिखाणाची आणि दिग्दर्शनाची धुरा पेलवली आहे.

केवल आणि सचिन आंबात यांची याआधी 'बहिणाबाई', 'रूपाचं चांदणं', 'रातचांदणं', 'नाखवा' ही गाणी मिलियन व्ह्यूज मिळवून सुपरहिट झाली आहेत. 'सपान' या गाण्याला छायाचित्रकार सागर आंबात याने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. गावाकडे चित्रित झालेले हे प्रेमगीत चांगलेच नजरेत भरतेय, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. एका रोमांचक प्रेमकथेचा आस्वाद 'सपान' या गाण्यातून 'स्वप्न स्वरूप' या युट्युब चॅनेलवर प्रेक्षकांना घेता येणार आहे.

IPL_Entry_Point