मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Lock Upp 2 Update: कंगना रनौतच्या ‘लॉक अप २’मध्ये सहभागी होऊ शकतात ‘हे’ कलाकार! पाहा यादी...

Lock Upp 2 Update: कंगना रनौतच्या ‘लॉक अप २’मध्ये सहभागी होऊ शकतात ‘हे’ कलाकार! पाहा यादी...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 21, 2023 03:34 PM IST

Lock Upp Season 2 Update: ‘लॉक अप २’ या शोने छोट्या पडद्यावर चांगलीच चर्चा निर्माण केली होती. या शोचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Lock Upp Season 2
Lock Upp Season 2

Lock Upp Season 2 Update: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘लॉक अप’चा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या आधी लॉकअप सीझन १मध्ये अनेक सेलिब्रिटी झळकले होते. या शोने छोट्या पडद्यावर चांगलीच चर्चा निर्माण केली होती. या शोचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये यंदा ‘बिग बॉस’च्या घरातील मंडळी सहभागी होणार आहेत. आता चाहते या नव्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. या शोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत पहिल्यांदाच शो होस्ट करताना दिसली होती.

‘लॉकअप’चा दुसरा सीझन पुढच्या महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये सुरू होणार असल्याचे म्हटले जात आहे. आता फॅन्स नव्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. यावेळी देखील कंगना रनौत या गेमची होस्ट असणार आहे. ‘लॉक अप सीझन २’ संदर्भात आतापर्यंत अनेक अपडेट्स समोर आल्या आहेत. या शोमध्ये कोण कोणते सेलिब्रिटी सहभागी होऊ शकतात याची यादी आता समोर आली आहे. यामध्ये काही वादग्रस्त सेलिब्रिटींची नावं देखील आहेत.

‘लॉक अप २’च्या यादीत पहिलं नाव आकाश ददलानी याचे आहे. आकाश ददलानी हा एक रॅपर असून, त्याने बॉलिवूडमध्येही काम केले आहे. आकाश ‘बिग बॉस ११’मध्येही दिसला आहे. ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत आतापर्यंत रिअॅलिटी शोचा एक भाग झाली आहे. आता ती ‘लॉक अप २’मध्ये देखील सहभागी होऊ शकते. राखी सावंतप्रमाणेच शर्लिन चोप्रा ही देखील अशीच एक अभिनेत्री आहे, जी तिच्या कामापेक्षा वादांमुळे चर्चेत असते. त्यामुळे या शोसाठी शर्लिन चोप्राचे नाव देखील चर्चेत आहे.

‘बिग बॉस १६’ या रिअॅलिटी शोमुळे शिव ठाकरे खूप चर्चेत आहेत. शोमधील त्याच्या शानदार खेळाने चाहत्यांना प्रभावित केले आहे. शिव ‘लॉक अप २’मध्ये देखील दिसू शकतो. शिव ठाकरेप्रमाणेच अर्चना गौतम देखील बिग बॉस १६मुळे खूप लोकप्रिय होत आहे. तिला देखील या शोमध्ये संधी मिळू शकते. अभिनेता प्रतीक सहजपाल हा बिग बॉस १५ आणि खतरों के खिलाडी सीझन १२चा प्रसिद्ध चेहरा आहे. त्याला देखील या शोमध्ये संधी मिळू शकते. रोडीजमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेला प्रियांक शर्मा देखील ‘लॉक अप २’मध्ये सहभागी होऊ शकतो.

IPL_Entry_Point