Pathaan Collection: शाहरुख खानच्या ‘पठाण’चा नवा विक्रम; पार केला १००० कोटींचा टप्पा!-pathaan box office collection shah rukh khan s pathaan movie cross 1000 cr ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan Collection: शाहरुख खानच्या ‘पठाण’चा नवा विक्रम; पार केला १००० कोटींचा टप्पा!

Pathaan Collection: शाहरुख खानच्या ‘पठाण’चा नवा विक्रम; पार केला १००० कोटींचा टप्पा!

Feb 21, 2023 05:36 PM IST

Pathaan Collection: ‘पठाण’ या चित्रपटाला रिलीजच्या पहिल्याच दिवसापासून लोकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.

Pathaan Box Office Collection
Pathaan Box Office Collection

Pathaan Collection: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ओपनिंग केले होते. त्यानंतर हा चित्रपट लवकरच १००० कोटींचा टप्पा पार करेल, असा अंदाज बांधला जात होता. अखेर या चित्रपटाने हा विक्रम रचला आहे. ‘पठाण’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १००० कोटींचा टप्पा पार केला आहे. ‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने जोरदार कमाई केली आहे.

‘पठाण’ने रिलीजच्या अवघ्या २७ दिवसांत या जगभरात १००० कोटींचा आकडा पार केला आहे. ‘यशराज फिल्म्स’ने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. २७ दिवसांत या चित्रपटाने भारतात ६२३ कोटी आणि परदेशात ३७७ कोटींचे कलेक्शन केले आहे. यासोबतच हा चित्रपट वर्ल्डवाईड कलेक्शनमध्ये १००० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. ‘पठाण’ रिलीजच्या पहिल्या टप्प्यात १००० कोटी कमावणारा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे.

‘पठाण’ या चित्रपटाला रिलीजच्या पहिल्याच दिवसापासून लोकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. या चित्रपटात शाहरुखशिवाय दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणासारखे दिग्गज कलाकार दिसले आहेत. यासोबतच सलमान खान देखील कॅमिओ भूमिकेत दिसला आहे. परदेशातही ‘पठाण’ थिएटर गाजवत आहे. या चित्रपटाचे वर्ल्डवाईड कलेक्शन देखील दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

‘पठाण’नंतर शाहरुखचे चाहते ‘जवान’ आणि ‘डंकी’ची वाट पाहत आहेत. ‘जवान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन साऊथचा प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली कुमार करत आहेत. तर, ‘डंकी’चे दिग्दर्शन राजकुमार हिरानी करत आहेत. अॅटलीचा ‘जवान’ हा चित्रपट २ जूनला प्रदर्शित होत आहे. तर, राजकुमार हिरानीचा ‘डंकी’ हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.