मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tejaswini Pandit Birthday: मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या तेजस्विनी पंडितने लावणीचे प्रयोग करून केला होता उदरनिर्वाह!

Tejaswini Pandit Birthday: मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या तेजस्विनी पंडितने लावणीचे प्रयोग करून केला होता उदरनिर्वाह!

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 23, 2023 07:36 AM IST

Happy Birthday Tejaswini Pandit: आपल्या दमदार अभिनयाने अवघं मनोरंजन विश्व दणाणून सोडणाऱ्या तेजस्विनीला कधीकाळी अठरा विश्व दारिद्र्याचा सामना करावा लागला होता.

Tejaswini Pandit
Tejaswini Pandit

Happy Birthday Tejaswini Pandit: मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री तेजस्विनी पंडित आज (२३ मे) आपला वाढदिवस साजरा करत आहे. तेजस्विनीचा जन्म पुण्यात झाला. आजघडीला आपल्या दमदार अभिनयाने अवघं मनोरंजन विश्व दणाणून सोडणाऱ्या तेजस्विनीला कधीकाळी अठरा विश्व दारिद्र्याचा सामना करावा लागला होता. पोट भरण्यासाठी, एक वेळच अन्न मिळवण्यासाठी देखील तिला खूप संघर्ष करावा लागला होता. या सगळ्या कठीण परिस्थितीवर मात करून आता तेजस्विनी एक चर्चित, लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

तेजस्विनी पंडित हिच्या आयुष्यात एक काळ इतका संघर्षमय आला होता की, तिला पडेल ते काम करावे लागत होते. आपल्या आयुष्यातील या कठीण काळाबद्दल स्वतः तेजस्विनी पंडित एका कार्यक्रमात बोलली होती. हा काळ तेव्हा होता, जेव्हा तेजस्विनीच्या कुटुंबावर बरंच कर्ज झालं होतं. लोकांचं कर्ज फेडायला त्यांच्याकडे पैसे नव्हते. घरातील जुजबी गोष्टींसाठी देखील त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यावेळी बील न भरल्याने त्यांच्या घराची वीज देखील कापली गेली होती. यावेळी तेजस्विनी आणि तिच्या कुटुंबाने तब्बल अडीच महिने मेणबत्तीच्या प्रकाशात काढले.

Rang Maza Vegla: कार्तिकचं बिंगं फुटणार? लेक दीपिकालाही बाबाचं खरं रूप कळणार! मालिकेत नवा ट्वीस्ट

याच दरम्यान त्यांच्यावर अशीही एक वेळ आली होती की, जेव्हा घरात फक्त एक रुपया शिल्लक होता. त्यासोबत घरात फक्त पिठीसाखर आणि मैदा सोडता काहीच खायला नव्हतं. तेव्हा, स्टोव्हवर मैद्याची बिस्किटं बनवून संपूर्ण कुटुंब जेवलं आणि ती रात्र तशीच काढली होती. या प्रसंगानंतर तेजस्विनीने ठरवलं की, कष्ट करून ही परिस्थिती आता पूर्ण बदलून टाकायची. त्याकाळात तेजस्विनी लावणीचे प्रयोग करायला लागली. लावणीचे प्रयोग करून त्याचे थोडेफार पैसे मिळायचे. दरम्यान तिने एका नाईटवेअर कंपनीची जाहिरात करून चांगले पैसे मिळवले आणि त्या पैशातून वीजबिल भरले होते.

अभिनय क्षेत्रात आपलं स्थान निर्माण करण्यासाठी देखील तिला बरेच कष्ट घ्यावे लागले होते. तेजस्विनीची आई त्याकाळात आघाडीची अभिनेत्री होती. पण, तरीही तिला या क्षेत्रात यायला बराच संघर्ष करायला लागला होता. तिची आई रंगभूमी कलाकार असल्याने त्यावेळी नुकत्याच आलेल्या टीव्ही आणि इतर माध्यमांसाठी तेजस्विनीला प्रचंड मेहनत घ्यावी लागली होती.

IPL_Entry_Point

विभाग