मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rang Maza Vegla: कार्तिकचं बिंगं फुटणार? लेक दीपिकालाही बाबाचं खरं रूप कळणार! मालिकेत नवा ट्वीस्ट

Rang Maza Vegla: कार्तिकचं बिंगं फुटणार? लेक दीपिकालाही बाबाचं खरं रूप कळणार! मालिकेत नवा ट्वीस्ट

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 22, 2023 03:32 PM IST

Rang Maza Vegla latest episode: दीपाला फसवण्यासाठी आता कार्तिक वेगवेगळे डाव रचताना दिसत आहे. तर, आता त्याने स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःवरच गोळी झाडून घेण्याचं नाटक केलं आहे.

Rang Maza Vegla
Rang Maza Vegla

Rang Maza Vegla latest episode:रंग माझा वेगळा’ या मालिकेत आता आणखी एक नवा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. या मालिकेत दीपा आणि कार्तिक यांचं नातं आता एका वेगळ्या वळणावर पोहोचलं आहे. दीपाला फसवण्यासाठी आता कार्तिक वेगवेगळे डाव रचताना दिसत आहे. तर, आता त्याने स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःवरच गोळी झाडून घेण्याचं नाटक केलं आहे. कार्तिकचं हेच खरं रूप दीपा सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, ती प्रत्येकवेळी अपयशी ठरत आहे.

कार्तिक आपल्यावर प्रेम नाही तर, आपला तिरस्कार करतो, हे सत्य दीपाला कळलं आहे. त्यामुळे आता दीपा स्वतः कार्तिकला त्याच्या जुन्या आयुष्यात परत आणण्याचा प्रयत्न करताना दिसत होती. मात्र, तिचे हे प्रयत्न फोल ठरले आहेत. दीपाच्या बोलण्यामुळे आपलं सत्य तिला कळलं हे कार्तिकच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे आता त्याला देखील मोठा धक्का बसला आहे. कार्तिकचा डाव लक्षात आल्यानंतर आता दीपा त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देताना दिसत आहे. मात्र, कार्तिकने पुन्हा एकदा कहर केला आहे. दीपाला जीवे मारण्यासाठी आणलेल्या बंदुकीने त्याने स्वतःवरच गोळी झाडून घेतली.

या घटनेनंतर कार्तिकला तत्काळ रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी कार्तिकने एक नाटक रचून सगळी खोटी कथा तयार केली. आता तेच सगळं तो सगळ्यांना सांगत आहे. आपण फार्महाऊसवर असताना तिथे एक चोर शिरला आणि त्याने चोरी करताना आपल्यावर गोळी झाडली, असे तो सांगत आहे. मात्र, खरं काय घडलं हे केवळ दीपालाचा माहित आहे. घडला सगळा प्रकार ती कुणालाच सांगू शकत नाहीये. त्यामुळे मन मोकळं करण्यासाठी ती विठोबाच्या मंदिरात जाते. विठोबासमोर आपली व्यथा मांडत असताना आता दीपिका तिचं बोलणं ऐकणार आहे. त्यामुळे आता दीपिकासमोर देखील तिच्या बाबाचा खरा चेहरा उघड होणार आहे.

IPL_Entry_Point