मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rang Maza Vegla: कार्तिक दीपाचा जीव घेऊ शकेल? ‘रंग माझा वेगळा’ मालिका उत्कंठावर्धक वळणावर!

Rang Maza Vegla: कार्तिक दीपाचा जीव घेऊ शकेल? ‘रंग माझा वेगळा’ मालिका उत्कंठावर्धक वळणावर!

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 12, 2023 03:27 PM IST

Rang Maza Vegla Latest Update: १४ वर्षांची शिक्षा भोगून आलेला कार्तिक दीपाशी खोटं वागत होता, हे सत्य आता तिला कळलं आहे. आपण वेडे झालो नसून, हा कार्तिकचा प्लॅन असल्याचेही तिच्या लक्षात आले आहे.

Rang Maza Vegla
Rang Maza Vegla

Rang Maza Vegla Latest Update:रंग माझा वेगळा’ या मालिकेत आता दीपा कार्तिकचं आयुष्य पुन्हा एकदा पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. कार्तिकच्या वागण्यातला बदल दीपाला वारंवार कळत होता. मात्र, तिच्यावर कुणीच विश्वास ठेवायला तयार नव्हतं. परंतु, आता दीपासमोर कार्तिकचा खरा चेहरा आहे. कार्तिक आपल्यावर प्रेम नाही तर, आपला तिरस्कार करतो, हे सत्य तिला कळलं आहे. त्यामुळे आता दीपा स्वतः कार्तिकला त्याच्या जुन्या आयुष्यात परत आणण्याचा प्रयत्न करणार आहे.

१४ वर्षांची शिक्षा भोगून आलेला कार्तिक दीपाशी खोटं वागत होता, हे सत्य आता तिला कळलं आहे. आपण वेडे झालो नसून, हा कार्तिकचा प्लॅन असल्याचेही तिच्या लक्षात आले आहे. कार्तिकचा डाव लक्षात आल्यानंतर आता दीपा त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देताना दिसणार आहे. दीपा कार्तिकचा खेळ आता त्याच्यावरच उलटवणार आहे. दीपावर आपलं किती प्रेम आहे, हे दाखवण्यासाठी कार्तिक तिला बाहेर फिअरायला घेऊन जाणार आहे. मात्र, दीपा त्याचा खेळ आधीच ओळखून आहे.

Ashneer Grover: भारतपे प्रकरण अंगाशी येणार; ‘शार्क टँक’ फेम अश्नीर ग्रोव्हरविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल!

कार्तिक दीपाला डेटवर नेणार असून, यावेळी तो दीपाचा जीव घ्यायचा प्रयत्न करणार आहे. दीपाला जीवे मारणं हा कार्तिकचा हेतू नाही. तर, आपल्याला १४ वर्षांत झालेला त्रास किती भयानक होता, हे दीपाला जाणवावं यासाठी तो तिला त्रास देत आहे. परंतु, आता कार्तिकच्या मनातील गोष्टी त्याच्या ओठांवर आणण्यासाठी दीपा त्याच्या हातात बंदूक देऊन स्वतःवर गोळी झाडण्यास सांगणार आहे. यावेळी आपला डाव आता दीपाच्या लक्षात आला आहे, हे आता कार्तिकला कळले आहे.

मात्र, कार्तिक आता दीपाचा जीव घेणार की, तिची माफी मागून पुन्हा एकदा नव्याने आपलं आयुष्य सुरू करणार का? हे मालिकेच्या येत्या भागांमधून कळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दीपासोबत सतत वेगवेगळे प्रकार घडत आहेत. कधी तिने केलेल्या पुरणपोळ्या गायब होतात. तर कधी तिच्या हातातील पेपर जळायला लागतात. तर, कधी तिच्या समोरची अक्षर देखील उलटी दिसू लागतात. नुकताच तिला किडनॅप करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला होता. या सगळ्यामागे कार्तिकचा हात होता, हे कळल्यानंतर दीपाला देखील धक्का बसला आहे.

WhatsApp channel