मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tu Chal Pudha: अश्विनीने घेतला शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय! लेक देणार का आईची साथ?

Tu Chal Pudha: अश्विनीने घेतला शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय! लेक देणार का आईची साथ?

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 22, 2023 03:04 PM IST

Tu chal Pudha Latest Episode: पार्लर सांभाळतानाच आता अश्विनी स्वतःच्या प्रोडक्ट्सचा व्यवसाय सुरु करणार आहे. मात्र, आता तिच्या नव्या व्यवसायात तिचं शिक्षण मोठा अडथळा बनणार आहे.

Tu chal Pudha
Tu chal Pudha

Tu chal Pudha Latest Episode:तू चाल पुढं’ मालिकेमध्ये अश्विनीने आता तिच्या नव्या प्रवासाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. पार्लर सांभाळतानाच आता अश्विनी स्वतःच्या प्रोडक्ट्सचा व्यवसाय सुरु करणार आहे. मात्र, आता तिच्या नव्या व्यवसायात तिचं शिक्षण मोठा अडथळा बनणार आहे. अश्विनीने लग्नानंतर आपलं शिक्षण अर्धवट सोडलं होतं. तर, आता ती ब्युटी प्रोडक्ट बनवण्याचा व्यवसाय सुरु करणार असली तरी, तिच्याकडे या संदर्भातील कोणतेही शिक्षण नाही. तसेच या विषयातील माहिती आणि पदवी देखील नसल्याने तिच्यावर टीकेची झोड उठली आहे.

शिल्पीच्या खेळीला बळी पडून घराबाहेर निघालेली अश्विनी आता स्वतःचा संसार नव्याने उभा करत आहे. यात तिला पती श्रेयससह अनेकांची साथ मिळत आहे. एकीकडे घर, संसार सांभाळून दुसरीकडे ती पार्लरची जबाबदारी देखील अतिशय संयमाने सांभाळत आहे. या सगळ्या जबाबदाऱ्या हाताळताना तिच्यावर आर्थिक बोजा देखील वाढत आहे. यातून लवकर बाहेर पडण्यासाठी अश्विनीने स्वतःचे प्रोडक्ट लाँच करण्याची योजना आखली होती. यासाठी तिने एकदा आपल्या चाहत्यांशी संवाद देखील साधला. मात्र, तिच्या या कल्पनेवर अनेक नकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या आहेत.

अश्विनीच्या या प्रोडक्ट रीलवर अनेक नकारात्मक प्रतिक्रिया आल्या. यापैकी एक प्रतिक्रिया होती ती तिच्या शिक्षणाबद्दल. आपल्या शिक्षणामुळे येणारा अडथळा लक्षात घेऊन आता अश्विनीने तिचं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्युटी प्रोडक्टशी संबंधित शिक्षण घेण्यासाठी आता अश्विनी कॉलेजमध्ये प्रवेश घेणार आहे. यासाठी तिने मुलगी मयुरी ज्या कॉलेजमध्ये शिकत आहे, तिथेच अश्विनी देखील प्रवेश घेणार आहे. मात्र, आता अश्विनीचा हा निर्णय तिच्या मुलीला म्हणजेच मयुरीला आवडणार नाहीये. आता मयुरी यावर काय प्रतिक्रिया देणार हे मालिकेच्या येत्या भागात कळणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग