Ajaz Khan gets bail Video: ‘बिग बॉस ७’चा माजी स्पर्धक आणि अभिनेता एजाज खानची अखेर तुरुंगातून सुटका झाली आहे. शुक्रवारी एजाज मुंबईतील आर्थर रोड कारागृहातून जामिनावर बाहेर आला. कारागृहाबाहेर त्याची वाट पाहत असलेल्या त्याच्या कुटुंबीयांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. तुरुंगातून बाहेर येताच एजाजने कुटुंबीयांना मोठं स्माईल दिलं आणि तिथे उपस्थित मीडियाला पोजही दिली. मात्र, हसत हसत तुरुंगातून बाहेर पडणारा एजाज खान आता चांगलाच ट्रोल होत आहे.
सध्या एजाज तुरुंगातून बाहेर पडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओची सुरुवात एजाजच्या कुटुंबातील सदस्यांची वाट पाहत असलेल्या एका झलकने होते. एजाज बाहेर येताच मोठ्या आवाजात त्याचे स्वागत केले जात होते. बाहेर येताच त्याने मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना मिठी मारली. त्याला पाहून त्याची पत्नी आयशा खानही भावूक झाली. अगदी आनंदी भाव चेहऱ्यावर घेऊन तो तुरुंगाबाहेर आला, हे पाहून काही नेटकरी संतापले आहेत.
‘याचं स्वागत तर असं करत आहेत, जसं काय हा सुवर्ण पदक जिंकून आला आहे’, ‘जिंकून आला नाहीये, तर हा तुरुंगात शिक्षा भोगून आला आहे’, ‘हा ड्रग्ज प्रकरणात अडकला होता, मग याचं स्वागत का केलं जात आहे’, अशा कमेंट्स करून नेटकरी त्याच्यावर टीका करत आहेत.
२०२१मध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अभिनेता एजाज खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केली. कथित ड्रग्ज तस्कर फारुख शेख उर्फ बटाटा याचा मुलगा शादाब शेख उर्फ शादाब बटाटा याच्या चौकशीत त्याचे नाव समोर आले होते. शादाब हा देखील ड्रग्ज पेडलर आहे. माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी त्यावेळी प्रसारमाध्यमांना सांगितले होते की, ‘चौकशीदरम्यान एजाज खानचे नाव समोर आले आणि आम्हाला त्याच्याविरुद्ध काही आक्षेपार्ह पुरावे मिळाले आहेत.’ एजाजच्या अटकेनंतर त्याच्याकडे काही झोपेच्या काही गोळ्या सापडल्या होत्या. या प्रकरणी तो तुरुंगात शिक्षा भोगत होता. आता त्याला जामीन मिळाला असून, तो तुरुंगातून बाहेर आला आहे.
संबंधित बातम्या