मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Reena Roy Birthday: प्रेमात धोका मिळताच रीना रॉय यांनी बांधली होती पाकिस्तानी क्रिकेटरशी लग्नगाठ!

Reena Roy Birthday: प्रेमात धोका मिळताच रीना रॉय यांनी बांधली होती पाकिस्तानी क्रिकेटरशी लग्नगाठ!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 07, 2024 09:15 AM IST

Happy Birthday Reena Roy: रीना रॉय यांनी'जरूरत' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र, त्यांना खरी ओळख'कालीचरण' या चित्रपटातून मिळालीहोती.

Happy Birthday Reena Roy
Happy Birthday Reena Roy

Happy Birthday Reena Roy: आपल्या दमदार अभिनयाने मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रीना रॉय यांचा आज (७ जानेवारी) वाढदिवस आहे.७ जानेवारी१९७५ रोजी जन्मलेल्या रीना यांचे वैयक्तिक आयुष्य एखाद्या फिल्मी कथेसारखेच होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रीना रॉय यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्याला लहानपणी क्लबमध्ये काम करायच्या. मात्र, रीना यांचे हेच काम त्यांना पुढे उपयोगी पडले. रीना रॉय यांनी १९७२मध्ये 'जरूरत' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र, त्यांना खरी ओळख१९७६मध्ये आलेल्या'कालीचरण' या चित्रपटातून मिळाली. या चित्रपटात रीना रॉय शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत मुख्य भूमिकेत झळकल्या होत्या.

‘कालीचरण’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉय यांच्यातील जवळीक वाढू लागली होती. रीना रॉय आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या वयात तब्बल ११ वर्षांचे अंतर होते. त्यावेळी त्यांच्या अफेअरची खूप चर्चा रंगली होती. या दरम्यान त्यांच्या चाहत्यांना असेही वाटू लागले होते की, ही जोडी लवकरच लग्न बंधनात अडकेल. दोघेही एकमेकांच्या खूप जवळ होते. मात्र, दरम्यानच्या काळात शत्रुघ्न सिन्हा यांच्या आयुष्यात पूनम यांची एन्ट्री झाली. त्यामुळे रीना आणि शत्रुघ्न यांच्यातील नात्यात दुरावा निर्माण झाला. याचा परिणाम असा झाला की, जवळपास सात वर्षे नात्यात असूनही रीना रॉय यांचे ब्रेकअप झाले.

शत्रुघ्न सिन्हासोबत ब्रेकअप झाल्यानंतर रीना रॉय यांनी १९८३मध्ये पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानसोबत लग्न केले होते. लग्नानंतर रीना रॉय पाकिस्तानला निघून गेल्या होत्या. कालांतराने रीना रॉय आणि मोहसीन खान यांना एक मुलगी झाली, जिचे नाव संम ठेवण्यात आले. मात्र, त्यानंतर रीना आणि मोहसीन यांच्यात भरपूर वाद होऊ लागले होते. अखेर १९९०मध्ये रीना रॉय यांनी मोहसीन खानपासून घटस्फोट घेतला आणि त्या भारतात परत आल्या. भारतात परतल्यावर त्यांनी पुन्हा एकदा मनोरंजन विश्वात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. मात्र, नंतर त्यांना पुन्हा प्रसिद्धी मिळालीच नाही.

WhatsApp channel

विभाग