Bipasha Basu Birthday: बॉलिवूडची ‘हॉरर क्वीन’! अभिनेत्री बिपाशा बसूबद्दल ‘हे’ माहीत आहे का?-happy birthday bipasha basu bollywood s horror queen do you know these things about actress ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bipasha Basu Birthday: बॉलिवूडची ‘हॉरर क्वीन’! अभिनेत्री बिपाशा बसूबद्दल ‘हे’ माहीत आहे का?

Bipasha Basu Birthday: बॉलिवूडची ‘हॉरर क्वीन’! अभिनेत्री बिपाशा बसूबद्दल ‘हे’ माहीत आहे का?

Jan 07, 2024 07:42 AM IST

Happy Birthday Bipasha Basu: बिपाशाबसूने'राझ', 'राझ-3', 'क्रिचर-3डी', 'अलोन' यांसारख्या हिंदी हॉरर चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Happy Birthday Bipasha Basu
Happy Birthday Bipasha Basu

Happy Birthday Bipasha Basu: बॉलिवूडमध्ये सर्वाधिक हिट हॉरर चित्रपट देणारी अभिनेत्री म्हणून बिपाशा बसूचे नाव घेतले जाते. बिपाशाचा उल्लेख झाला की,‘राझ’ चित्रपटात तिने साकारलेली संजना धनराज ही व्यक्तिरेखा लगेच डोळ्यांसमोर येते. या चित्रपटासोबतच बिपाशाच्या अभिनयाचेदेखील कौतुक झाले. आज (७ जानेवारी) अभिनेत्री बिपाशा बसू आपला वाढदिवस साजरा करत आहे. बिपाशाने 'राझ', 'राझ-3', 'क्रिचर-3डी', 'अलोन' यांसारख्या हिंदी हॉरर चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त तामिळ, तेलुगू आणि बंगाली चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे.

७ जानेवारी १९७८ रोजी नवी दिल्लीतील हिंदू बंगाली कुटुंबात बिपाशा बसू हिचा जन्म झाला. कोलकातामध्ये सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बिपाशा बसूने १९९६मध्ये कोलकाता येथे मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. कोलकात्यात तिची भेट अर्जुन रामपालची माजी पत्नी आणि मॉडेल मेहर जसियाशी झाली.मेहेरने बिपाशाला गोदरेज सिंथॉल सुपर मॉडेल स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले आणि तिथूनच बिपाशाच्या नशिबाचे तारे चमकले.

Prashant Damle : मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय! अभिनेते प्रशांत दामले असं का म्हणाले? वाचा...

गोदरेज सिंथॉल सुपर मॉडेल ही स्पर्धा जिंकल्यानंतर विनोद खन्ना यांनी बिपाशाला त्यांचा मुलगा अक्षय खन्नासोबत'हिमालयपुत्र' या चित्रपटात लाँच करण्याचा निर्णय घेतला. पण, वयामुळे बिपाशाने ही भूमिका करण्यास नकार दिला. त्यानंतर २००१मध्ये अब्बास मस्तान दिग्दर्शित'अजनबी' या चित्रपटातून बिपाशा बसू हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ती अक्षय कुमारसोबत झळकली होती.'अजनबी'मध्ये बिपाशा नकारात्मक भूमिकेत दिसली होती. बिपाशाला या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

यानंतर २००३मध्ये आलेल्या'जिस्म' चित्रपटातून बिपाशाने सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले होते. या चित्रपटानंतर बिपाशा बसू हिने कधीच मागे वळून पहिले नाही.'जिस्म'मध्ये बिपाशा बसूसोबत अभिनेता जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत झळकला होता. चित्रपटासोबतच बिपाशा आणि जॉनची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. या चित्रपटातील दोघांची जोडीही त्या काळातील यशस्वी जोडी ठरली होती.हॉररशिवाय बिपाशाने'कॉर्पोरेट', 'नो एंट्री', 'फिर हेरा फेरी', 'ऑल द बेस्ट फन बिगिन', 'बचना ए हसीनो', 'धूम-२', 'रेस' यासारख्या हलक्याफुलक्या विषयांच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Whats_app_banner
विभाग