मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gadar 2 Teaser OUT: पाकिस्तानचा जावई बनलेला तारा सिंह हुंड्यात मागतोय लाहोर! ‘गदर २’चा टीझर पाहिलात?

Gadar 2 Teaser OUT: पाकिस्तानचा जावई बनलेला तारा सिंह हुंड्यात मागतोय लाहोर! ‘गदर २’चा टीझर पाहिलात?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jun 12, 2023 01:42 PM IST

Gadar 2 Teaser OUT: यावेळी पूर्वीपेक्षा अधिक चीड डोक्यात घेऊन तारा सिंह याने पाकिस्तानच्या भूमीवर पाऊल ठेवले आहे.

Gadar 2 Teaser OUT
Gadar 2 Teaser OUT

Gadar 2 Teaser OUT: गेल्या काही दिवसांपासून ‘गदर २’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या कथानकात तब्बल २२ वर्षांनंतर तारा सिंह पाकिस्तानचा जावई म्हणून परतणार आहे. मात्र, यावेळी पूर्वीपेक्षा अधिक चीड डोक्यात घेऊन तारा सिंह याने पाकिस्तानच्या भूमीवर पाऊल ठेवले आहे. तारा सिंहच्या एन्ट्रीमुळे आता पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. या काही मिनिटांच्या टीझरमुळे 'गदर 2' चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करू शकतो, असा अंदाज बांधला जात आहे. ‘गदर २’चा हा टीझर ‘सकिना’ म्हणजेच अमिषा पटेलने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

या टीझरची सुरुवात एका संवादाने होते. ‘तो पाकिस्तानचा जावई आहे. त्याला नारळ द्या आणि टिळा लावा. अन्यथा, यावेळी तो हुंड्यात लाहोर घेऊन जाईल’, हा संवाद ऐकू येतो. यानंतर तारा सिंहची जबरदस्त एन्ट्री होते, जो अतिशय रागात दिसत आहे. यानंतर तारा सिंह बैलगाडीचे चाक उखडून हवेत फिरवताना दिसत आहेत. हा सीन पाहता ‘गदर २’मध्ये चाहत्यांना ‘गदर’पेक्षा जास्त अॅक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत, असा अंदाज बांधला जात आहे.

तर याच टीझरच्या शेवटी तारा सिंह रडताना दिसत आहे. हा टीझर रिलीज होताच चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. चित्रपटाचा टीझर अमिषा पटेलने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले- ‘तारा सिंह परत आला आहे.’

रिपोर्ट नुसार, ‘गदर २’चं कथानक १९७०मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित असणार आहे. या चित्रपटात तारा सिंह आणि सकीना यांचा मुलगा ‘जीते’ भारतीय सैनिकाच्या रुपात दिसणार आहे. या भूमिकेत उत्कर्ष शर्मा झळकणार आहे. ‘गदर’मध्ये तारा सिंह आपल्या पत्नीला परत आणण्यासाठी पाकिस्तानात गेला होता. यावेळी तो आपल्या मुलाला सोडवण्यासाठी पाकिस्तानामध्ये शिरकाव करताना दिसणार आहे. सनी देओल 'गदर २' घेऊन पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे.

IPL_Entry_Point

विभाग