मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Zara Hatke Zara Bachke: बॉक्स ऑफिसवर दिसली विकी-साराची जादू; ‘जरा बचके जरा हटके’ची छप्परफाड कमाई!

Zara Hatke Zara Bachke: बॉक्स ऑफिसवर दिसली विकी-साराची जादू; ‘जरा बचके जरा हटके’ची छप्परफाड कमाई!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jun 12, 2023 12:13 PM IST

Zara Hatke Zara Bachke Box Office Collection: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता विकी कौशल यांचा ‘जरा बचके जरा हटके’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

Zara Hatke Zara Bachke Box Office Collection
Zara Hatke Zara Bachke Box Office Collection

Zara Hatke Zara Bachke Box Office Collection: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता विकी कौशल यांचा ‘जरा बचके जरा हटके’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. विकी कौशल आणि सारा अली खान यांचा रोमँटिक ड्रामा चित्रपट ‘जरा हटके जरा बचके’ रिलीज होऊन आता ११ दिवस उलटले आहेत. तर, आता या चित्रपटासाठी एक नवीन आठवडा सुरू झाला आहे. मागील वीकेंड या चित्रपटासाठी खूप चांगला ठरला आहे. चित्रपटाच्या कमाईचे आकडे पाहून आता निर्मात्यांचा आणि स्टार्सचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. चित्रपटाच्या मेकिंगसाठी गुंतवलेल्या बजेटपेक्षा अधिक कमाई आता या चित्रपटाने केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मीडिया रिपोर्टनुसार, विकी आणि साराचा हा चित्रपट अवघ्या ४० कोटींमध्ये बजेटमध्ये बनला होता. विकी आणि सारा व्यतिरिक्त या चित्रपटात कोणताही तिसरा महागडा स्टार नाही. या चित्रपटाचे लोकेशनही फारसे महागडे नाही. यूपीमध्ये शूट झालेल्या या चित्रपटात अतिशय साधेसे कपडे निवडण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत चित्रपटाचे बजेट अगदीच कमी ठेवण्यात आले होते. पण, या चित्रपटात रोमान्स आणि ड्रामाचा मोठा धमाका आहे. त्यामुळे विकी आणि साराच्या या खोट्या खोट्या घटस्फोटाची मनोरंजक कथा पाहण्यासाठी लोक थिएटरमध्ये जात आहेत.

Avika Gor: साऊथ इंडस्ट्री म्हणजे नेपोटीझमचं दुकान!; ‘बालिका वधू’ अविका गौर असं का म्हणाली?

आता या चित्रपटाच्या दहाव्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. या शनिवार आणि रविवारी चित्रपटाच्या कमाईच्या आकडेवारीत मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटाने शनिवारी ५.७६ कोटींचा व्यवसाय केला. तर, दहाव्या दिवशी या चित्रपटाने ६.७५ कोटी कलेक्शन केले आहे.

आता ‘जरा बचके जरा हटके’ या चित्रपटाचे एकूण कलेक्शन ५३.२८ कोटींवर पोहोचले आहे. म्हणजेच चित्रपटाने आपल्या मेकिंग बजेटचे सर्व पैसे वसूल केले आहेत. तसेच, आता हा चित्रपट चांगलाच नफ्यात चालला आहे. जिथे संधी मिळेल, तिथे विकी आणि सारा त्यांच्या या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. विकी कौशल आणि सारा अली खान यांचा हलका फुलका विनोदी चित्रपट प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहे.

IPL_Entry_Point