मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  The Archies: ‘द आर्चिज’ चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज; शाहरुख खानच्या लेकीने वेधलं साऱ्यांचं लक्ष!

The Archies: ‘द आर्चिज’ चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज; शाहरुख खानच्या लेकीने वेधलं साऱ्यांचं लक्ष!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jun 12, 2023 12:57 PM IST

The Archies News Poster: ‘द आर्चिज’च्या नव्या पोस्टरमध्ये शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाच्या शेजारी पोज देताना दिसली आहे.

The Archies
The Archies

The Archies News Poster Out: गेल्या काही महिन्यांपासून ‘द आर्चिज’ या चित्रपटची जोरदार चर्चा सुरू आहे. या एकाच बॉलिवूड चित्रपटातून ३ स्टारकिड्स एकत्र मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहेत. अभिनेत्री खुशी कपूर हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर या चित्रपटाचं एक नवं शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये, बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाच्या शेजारी पोज देताना दिसली आहे. तर, बोनी कपूरची मुलगी खुशी कपूर केसांना वेगळा रंग देऊन खाली बसलेली दिसत आहे. या चित्रपटाचे पोस्टर शेअर करून खुशी कपूरने हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, या चित्रपटाची रिलीजची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

ट्रेंडिंग न्यूज

या पोस्टरमध्ये खुशी कपूर खूपच वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीने तिचे केस लहान केले आहेत आणि केसांचा वेगळा रंग देखील केला आहे. या लूकमध्ये ती ओपन प्रिंटेड शर्ट परिधान करून हसताना दिसली आहे. खुशी कपूर या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. या चित्रपटातून खुशी कपूर, अगस्त्य नंदा आणि सुहाना खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.

Zara Hatke Zara Bachke: बॉक्स ऑफिसवर दिसली विकी-साराची जादू; ‘जरा बचके जरा हटके’ची छप्परफाड कमाई!

या चित्रपटात खुशी कपूर एका वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. तर, शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खानही लाईमलाईट खेचताना दिसली आहे. सुहानाने गडद जांभळ्या रंगाचा फुल स्लीव्ह टॉप घातला आहे आणि तिच्या शेजारी अगस्त्य नंदा दिसत आहे. या फोटोमध्ये हे दोघेही सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. यामागे एक खास कारण देखील आहे. मागील काही काळापासून हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत.

‘द आर्चिज’ संदर्भातील ही पोस्ट खुशी कपूरने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'भेटा आर्चिजच्या गँगला... नेटफ्लिक्सवर लवकरच येत आहे.' खुशीने या चित्रपटाचे पोस्टर शेअर करताच अंशुला कपूर आणि महीप कपूर यांनी कमेंटमध्ये हार्ट इमोजी शेअर केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन झोया अख्तरने केले आहे. ‘द आर्चिज’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

IPL_Entry_Point

विभाग