मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Drishyam: कोरियन्सनाही बॉलिवूडची भुरळ! कान्समध्ये झाली ‘दृश्यम’ चित्रपटाच्या कोरियन रिमेकची घोषणा!

Drishyam: कोरियन्सनाही बॉलिवूडची भुरळ! कान्समध्ये झाली ‘दृश्यम’ चित्रपटाच्या कोरियन रिमेकची घोषणा!

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 22, 2023 08:03 AM IST

Drishyam Movie Korean Remake: बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याच्या ‘दृश्यम’ या चित्रपटाच्या कोरियन रिमेकची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.

Drishyam Movie Korean Remake
Drishyam Movie Korean Remake

Drishyam Movie Korean Remake: भारतात तर के-ड्रामा आणि के-पॉपची हवा आता सगळीकडेच पाहायला मिळत आहे. मात्र आता कोरियातील लोकांनाही बॉलिवूडची भुरळ पडली आहे. बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याच्या ‘दृश्यम’ या चित्रपटाच्या कोरियन रिमेकची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. कान्स सारख्या मोठ्या, जागतिक मंचावर ‘दृश्यम’चे कोरियन व्हर्जन बनणार असल्याचे जाहीर केले गेले. साऊथ आणि बॉलिवूडमध्ये बनलेल्या 'दृश्यम' फ्रेंचाइजीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन केले होते.

ट्रेंडिंग न्यूज

‘दृश्यम’च्या मल्याळम व्हर्जनमध्ये अभिनेता मोहनलाल मुख्य भूमिकेत होता आणि जीतू जोसेफने हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाला मिलेल्या तुफान यशानंतर आणखी चार भारतीय भाषांमध्ये त्याचा रिमेक करण्यात आला. यामध्ये कन्नड, तेलुगू, तमिळ आणि हिंदीचा समावेश आहे. हिंदीमध्ये अजय देवगण, श्रिया सरन आणि तब्बू यांच्या प्रमुख भूमिका होत्या. 'दृश्यम' हा क्राईम थ्रिलर चित्रपट आहे. मल्याळममधील 'दृश्यम' २०१३मध्ये प्रदर्शित झाला होता. तर, दोन वर्षांनंतर २०१५मध्ये तो हिंदीत प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

TMKOC: ‘तारक मेहता’च्या सेटवर कलाकारांची छळवणूक होते! ‘रिटा रिपोर्टर’नेही सांगितली आपबिती

भारतीय भाषांनंतर आता कोरियन भाषेत 'दृश्यम' बनणार आहे. भारतातील पॅनोरमा स्टुडिओ आणि दक्षिण कोरियाच्या अँथॉलॉजी स्टुडिओने याची घोषणा केली. कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या इंडियन पॅव्हेलियनमध्ये निर्मात्यांनी ही मोठी घोषणा केली. यावेळी दोन्ही स्टुडिओचे प्रमुख कुमार मंगत पाठक आणि जे-चोई उपस्थित होते. निर्मात्यांच्या या मोठ्या घोषणेनंतर अधिकृतपणे कोरियन भाषेत बनणारा ‘दृश्यम’ हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. ऑस्कर विजेता चित्रपट ‘पॅरासाईट’मध्ये मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता साँग कांग-हो या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

‘दृश्यम’च्या कोरियन रिमेकचे दिग्दर्शन किम जी-वून करणार आहेत. याबद्दल बोलताना अँथॉलॉजी स्टुडिओचे प्रमुख जे-चोई म्हणाले की, ‘आम्ही या यशस्वी चित्रपटाचा कोरियन रिमेक करण्यासाठी खूप उत्सुक आहोत. भारत आणि कोरिया यांच्यात पहिल्यांदाच होत असलेल्या या प्रकल्पाला खूपच महत्त्व असणार आहे. या प्रोजेक्टमधून आम्ही भारतीय आणि कोरियन चित्रपटसृष्टीला एकत्र आणू शकू.’

IPL_Entry_Point

विभाग