मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Dev Anand Death Anniversary: देव आनंद यांच्या काळ्या कपड्यांवर ‘या’मुळे घालण्यात आली होती बंदी!

Dev Anand Death Anniversary: देव आनंद यांच्या काळ्या कपड्यांवर ‘या’मुळे घालण्यात आली होती बंदी!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 03, 2022 08:07 AM IST

Dev Anand Death Anniversary: आपल्या अभिनयाने आणि हटके स्टाईलने मनोरंजन विश्व गाजवणारे सदाबहार अभिनेते देव आनंद यांची आज पुण्यतिथी.

Dev Anand
Dev Anand

Dev Anand Death Anniversary: आपल्या अभिनयाने आणि हटके स्टाईलने मनोरंजन विश्व गाजवणारे सदाबहार अभिनेते देव आनंद यांची आज पुण्यतिथी. आज जरी ते शरीर रूपाने आपल्यात नसले, तरी त्यांच्या अभिनयाच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या मनात मात्र कायम जिवंत आहेत. २६ सप्टेंबर १९२३ रोजी पंजाबमध्ये त्यांचा जन्म झाला. मात्र, भारत-पाक फाळणी दरम्यान हा भाग पाकिस्तानात गेल्याने, त्यांनी भारतात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. १९४६मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम एक है’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

ट्रेंडिंग न्यूज

या काळात अभिनेते देव आनंद तरुणींमध्ये इतके प्रसिद्ध होते की, त्यांची एक झलक मिळवण्यासाठी तरुणी काहीही करायला तयार असायच्या. देव आनंद यांच्यासाठी महिल्या चाहत्या इतक्या वेड्या झाल्या होत्या की, काहींनी तर स्वतःच्या जीवाची देखील पर्वा केली नाही. ‘काला पानी’ नावाच्या चित्रपटात देव आनंद यांच्या काळे कपडे परिधान करण्यावर देखील बंदी घालण्यात आली होती. काळ्या कपड्यात देव आनंद इतके राजबिंडे दिसायचे की, त्यांची एक झलक बघण्यासाठी काही तरुणींनी छतावरून उड्या मारल्या होत्या. तेव्हापासून देव आनंद यांना काळे कपडे परिधान करण्यास मनाई करण्यात आली होती.

लाखो तरुणींच्या गळ्यातील ताईत बनलेल्या देव आनंद यांचं अभिनेत्री सुरैय्यावर प्रेम होतं. ‘विद्या’ या चित्रपटाच्या सेटवर एकत्र काम करत असताना ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. सुरैय्या यांना प्रपोज करण्यासाठी देव आनंद यांनी अंगठी देखील आणली होती. मात्र, देव आनंद हिंदू आणि सुरैय्या मुस्लिम असल्याने अभिनेत्रीच्या घरून या नात्याला प्रचंड विरोध झाला. देव आनंद यांच्याशी नातं तुटल्यावर सुरैय्या आजन्म अविवाहित राहिल्या.

केवळ सामान्य चाहत्याच नव्हे तर, अनेक अभिनेत्री देखील देव आनंद यांना आपलं हृदय देऊन बसल्या होत्या. ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटात देव आनंद यांच्या बहिणीची भूमिका साकारण्यासाठी एकही अभिनेत्री तयार होत नव्हती. काही नवोदित अभिनेत्रींनी या भूमिकेसाठी तयारी दर्शवली मात्र, त्यांच्या वाट्याला ही भूमिका आली नाही. या दरम्यानच्या काळात त्यांची भेट अभिनेत्री झीनत अमान यांच्याशी झाली. देव आनंद यांना या भूमिकेसाठी झीनत परफेक्ट वाटल्या आणि त्यांनी या चित्रपटासाठी झीनत अमान यांनाच साईन केले.

आपला मृत्यू भारत देशाबाहेर व्हावा, अशी देव आनंद यांची इच्छा होती. ३ सप्टेंबर २०११ रोजी लंडनमध्ये वास्तव्यास असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि यातच त्यांचे निधन झाले.

IPL_Entry_Point

विभाग