मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shah Rukh Khan: शाहरुख खाननं मक्कामध्ये जाऊन घेतलं काब्याचं दर्शन

Shah Rukh Khan: शाहरुख खाननं मक्कामध्ये जाऊन घेतलं काब्याचं दर्शन

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 02, 2022 12:41 PM IST

Shah Rukh Khan: सौदीमध्ये शूटिंग पूर्ण झाल्यानंतर शाहरुख खानने मक्का शरीफला भेट देऊन उमराह करावा, अशी विनंती त्याच्या अनेक चाहत्यांनी केली होती.

Shah Rukh Khan
Shah Rukh Khan

Shah Rukh Khan: बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे प्रचंड चर्चेत आहे. येत्या नवीन वर्षात शाहरुख तीन नव्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच त्यांच्या ‘डंकी’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. सौदी अरेबियात पार पडलेल्या या शूटिंगनंतर शाहरुख खानने मक्का मशिदीला भेट देत ‘उमराह’ केला आहे. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

‘डंकी’चं शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती देणाऱ्या अभिनेता शाहरुख खान याचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. यावेळी शाहरुख खान नेहमीप्रमाणे त्याच्या डॅशिंग लूकमध्ये नाही तर, अतिशय धार्मिक लूकमध्ये दिसला. अंगावर पांढरा कपडा परिधान केलेल्या शाहरुख खान याने चेहऱ्यावर मास्क परिधान केले होते. यावेळी चाहते देखील आपल्या लाडक्या अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी उस्तुक होते. ‘डंकी’ चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुख सौदीमध्ये होता.

सौदीमध्ये शूटिंग पूर्ण झाल्यानंतर शाहरुख खानने मक्का शरीफला भेट देऊन उमराह करावा, अशी विनंती त्याच्या अनेक चाहत्यांनी केली होती. उमराह हा मुस्लिम धर्मीयांच्या प्रार्थनेचा एक प्रकार आहे. नेहमीच आपल्या चाहत्यांच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या शाहरुख खानने यावेळी देखील त्यांच्या विनंतीचा मान राखला आणि मक्का मशिदीत जाऊन उमराह केला. याचे फोटो आणि व्हिडीओ काही फॅनपेजवरून व्हायरल झाले आहेत. चाहते यावर कमेंट्स करून शाहरुख खानचे कौतुक करत आहेत. तर, उमराह करताना शाहरुख खूप भावूक झाला होता, असे देखील काही चाहत्यांनी म्हटले.

नुकतेच शाहरुख खान याच्या ‘डंकी’ या चित्रपटाचे चित्रीकरण सौदी अरेबियामध्ये पूर्ण झाले आहे. एक व्हिडीओ शेअर करत त्याने या संदर्भात माहिती दिली होती. ‘सौदी अरेबियाच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे खूप खूप आभार. तसेच, 'डंकी'च्या टीमचे आणि या शूटमध्ये ज्यांनी साथ दिली त्या सर्वांचे आभार. हे शेड्युल खूप छान प्रकारे पार पडले’, असे त्याने कॅप्शनमध्ये लिहिले होते.

IPL_Entry_Point

विभाग