मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shah Rukh Khan: ‘डॉन ३’ चित्रपटामधून शाहरुख खान आऊट; बॉलिवूडचा ‘बाजीराव’ करणार SRkला रिप्लेस!

Shah Rukh Khan: ‘डॉन ३’ चित्रपटामधून शाहरुख खान आऊट; बॉलिवूडचा ‘बाजीराव’ करणार SRkला रिप्लेस!

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 20, 2023 08:23 AM IST

Shah Rukh Khan Don 3: बॉलिवूडचा ‘पठाण’ अर्थात शाहरुख खानने स्वत: या चित्रपटाची ऑफर नाकारली आहे. शाहरुखने नकार दिल्यानंतर हा चित्रपट दुसऱ्या अभिनेत्याकडे गेला आहे.

Shah Rukh Khan Don 3
Shah Rukh Khan Don 3

Shah Rukh Khan Don 3: बॉलिवूडमध्ये सध्या शाहरुख खानचा गाजावाजा पाहायला मिळत आहे. शाहरुख खानच्या ‘पठान’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. आता शाहरुख खान त्यांच्या आगामी चित्रपटांची म्हणजेच ‘जवान’ आणि ‘डंकी’ची जोरदार तयारी करत आहे. या दरम्यान आता ‘डॉन ३’ हा चित्रपट देखील चर्चेत आला आहे. ‘डॉन ३’ या चित्रपटातून शाहरुख खान बाहेर पडल्याची जोरदार चर्चा रंगली होती. अखेर आता शाहरुख खानला या चित्रपटात रिप्लेस करणाऱ्या अभिनेत्याचे नावही समोर आले आहे. बॉलिवूडचा ‘बाजीराव’ अर्थात अभिनेता रणवीर सिंह ‘डॉन ३’ चित्रपटात शाहरुख खानची जागा घेणार असल्याचे बोलले जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘महानायक’ अमिताभ बच्चन यांच्या 'डॉन' या चित्रपटाचा रिमेक २००६मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या रीमेक चित्रपटामध्ये शाहरुख खानने मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर २०११ मध्ये रिलीज झालेला 'डॉन 2' या चित्रपटात शाहरुखसोबत प्रियांका चोप्रा देखील झळकली होती. दोन्ही चित्रपट फरहान अख्तरने दिग्दर्शित केले होते. आता 'डॉन ३'ची कमानही फरहान अख्तरच्या हाती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे शूटिंग या वर्षी सुरू होणार आहे आणि हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच २०२४मध्ये रिलीज होऊ शकतो. मात्र, या चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

मीडिया रिपोर्टनुसार, बॉलिवूडचा पठाण अर्थात शाहरुख खानने स्वत: या चित्रपटाची ऑफर नाकारली आहे. शाहरुखने नकार दिल्यानंतर हा चित्रपट रणवीर सिंहकडे गेला आहे. रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, शाहरुख खानला या चित्रपटाची स्क्रिप्ट फारशी रुचलेली नाही. त्याला असे व्यावसायिक चित्रपट करायचे आहेत, ज्यात प्रेक्षकांना आवडेल असाच मसाला असेल. तर, त्याच्या या यादीत 'डॉन' चित्रपट कुठेच बसत’ नव्हता. तर, रणवीर सिंह याने याआधी एक्सेल एंटरटेनमेंटसोबत 'दिल धडकने दो' आणि 'गली बॉय' या चित्रपटांमध्ये काम केले आहे. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यामुळे शाहरुखने नकार दिल्यानंतर हा चित्रपट रणवीरकडे गेला आहे.

IPL_Entry_Point