मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Jr NTR Birthday: ‘आरआरआर’ फेम अभिनेता ज्युनियर एनटीआरबद्दल ‘या’ गोष्टी ऐकल्यात का?

Jr NTR Birthday: ‘आरआरआर’ फेम अभिनेता ज्युनियर एनटीआरबद्दल ‘या’ गोष्टी ऐकल्यात का?

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 20, 2023 07:45 AM IST

Happy Birthday Jr NTR : घरातूनच बाळकडू मिळालेल्या या अभिनेत्याने वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षी बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली.

Jr NTR
Jr NTR

Happy Birthday Jr NTR : साऊथ सुपरस्टार नंदामुरी तारका रामाराव अर्थात ज्युनियर एनटीआर आज (२० मे) आपला वाढदिवस साजर करत आहे. ज्युनियर एनटीआरचा जन्म २० मे १९८३ रोजी तेलंगणातील हैदराबाद शहरात झाला. अभिनेता ज्युनियर आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.टी. रामाराव यांचा नातू. ज्युनियर एनटीआरचे वडील नंदामुरी हरिकृष्णा हे देखील प्रसिद्ध अभिनेते, चित्रपट निर्माता आणि राजकारणी होते. ज्युनियर एनटीआरने आपले प्रारंभिक शिक्षण हैदराबाद, तेलंगणा येथील 'विद्यारण्य हायस्कूल, हैदराबाद'मधून केले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्याने हैदराबाद येथील सेंट मेरी कॉलेज, हैदराबाद येथे प्रवेश घेतला आणि तेथून त्याने बी.टेक.ची पदवी प्राप्त केली.

एनटीआर यांचा जन्म राजकारण आणि चित्रपट जगताशी निगडीत असलेल्या कुटुंबात झाला. त्याचे आजोबा राजकारणाशी निगडीत होते, तर वडील चित्रपट जगतात सक्रिय होते. यामुळेच घरातूनच बाळकडू मिळालेल्या या अभिनेत्याने वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षी बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली. यानंतर त्याने १९९६मध्ये ‘रामायणम’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटातील त्यांच्या दमदार अभिनयासाठी त्याला 'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' देण्यात आला.

Tuzech Mi Geet Gaat Aahe: मंजुळा आणि मोनिकामध्ये रंगणार जुगलबंदी; मालिका रंजक वळणावर

यानंतर ज्युनियर एनटीआरला २००१मध्ये रिलीज झालेल्या ‘स्टुडंट नंबर १’ चित्रपटात मुख्य भूमिका मिळाली होती. त्यांच्या अभिनयाच्या प्रवासात अनेक चढउतार आले, पण तरीही त्याने कधीही हार मानली नाही. आज एक यशस्वी कलाकार म्हणून तो सर्वांसमोर उभा आहे. ज्युनियर एनटीआरने टीव्हीच्या छोट्या पडद्यावरही आपले नशीब आजमावून पहिले आहे. अभिनेता ज्युनियर एनटीआर याने २०१७मध्ये ‘बिग बॉस (तेलुगु)’ हा शो होस्ट केला होत्या. त्याने होस्ट केलेल्या या सीझनला तुफान लोकप्रियता मिळाली होती. छोट्या पडद्यावरील त्याचं काम चाहत्यांना आवडलं होतं.

‘आरआरआर’ या चित्रपटातून ज्युनियर एनटीआरने जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटातील त्याच्या कामाला चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटानंतर त्याने सर्वांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले. ज्युनियर एनटीआर अभिनित या चित्रपटाने ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरून भारताची मान गर्वाने आणि अभिमानाने उंचावली.

IPL_Entry_Point

विभाग