मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Neetu Kapoor: नीतू कपूर यांनी खरेदी केलेला ५ बीएचके फ्लॅट पाहिलात का? फोटो आले समोर

Neetu Kapoor: नीतू कपूर यांनी खरेदी केलेला ५ बीएचके फ्लॅट पाहिलात का? फोटो आले समोर

Aarti Vilas Borade HT Marathi
May 19, 2023 02:18 PM IST

Neetu Kapoor New House: नीतू कपूर यांनी मुंबईतील वांद्रे येथील परिसरात लग्झरी फ्लॅट खरेदी केला आहे. या घराचे फोटो आता समोर आले आहे

Neetu Kapoor New House
Neetu Kapoor New House

एकेकाळी बॉलिवूडवर राज्य करणारी अभिनेत्री म्हणून नीतू कपूर ओळखल्या जातात. नुकताच नीतू कपूर यांनी मुंबईत नवे लग्झरी घर खरेदी केले आहे. या घराची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल. आता या घराचे फोटो समोर आले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

नीतू कपूर यांनी वांद्रे येथील सोफीटेल हॉटेल समोर असलेल्या सनटेक रिअॅलिटी प्रोजेक्ट या बिल्डींगमध्ये सातव्या मजल्यावर लग्झरी घर खरेदी केले आहे. या घराची किंमत १७.४० कोटी रुपये आहे. हे घर ३३८७ क्वेअर फीटमध्ये आहे. १० मे रोजी नीतू कपूर यांनी या घरासाठी १ कोटी ४ लाख रुपये स्टँप ड्यूटी भरली आहे.

House
House

नीतू कपूर यांनी खरेदी केलेल्या घराची बिल्डींग ही १९ मजल्यांची आहे. नीतू कपूर यांचे घर ५ बीएचके आहे. त्यांच्या घरात स्विमिंग पूल आहे ज्याचे तापमान कंट्रोल करता येणार आहे. तसेच जीम, स्क्वॅश कोर्ट आणि व्हर्चुअल गोल्फ देखील आहे. आता त्यांच्या घरातील फोटो समोर आले आहेत.

यापूर्वी नीतू कपूर यांची सून अभिनेत्री आलिया भट्टने पाली हिल्स परिसरात ३७ कोटी ८० लाख रुपयांचे घर खरेदी केले. हे घर २४९७ क्वेअर फीट असून वांद्रे येथील एरियल व्ह्यू कॉपरेटिव हाउसिंग सोयासटीमध्ये आहे. आलिया भट्टने या घरासाठी २ कोटी २६ लाख रुपये स्टँप ड्यूटी भरली आहे. ज्या दिवशी हे घर रजिस्टर झाले त्याच दिवशी आलियाने बहिण शाहीन भट्टला मुंबईत दोन घरे गिफ्ट म्हणून दिली. या दोन्ही घरांची किम्मत जवळपास ७ कोटी ६८ लाख रुपये आहे.

IPL_Entry_Point

विभाग