मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss OTT 2: ‘बिग बॉस ओटीटी’चा सीझन २ ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला! स्पर्धकांची नावही ठरली

Bigg Boss OTT 2: ‘बिग बॉस ओटीटी’चा सीझन २ ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला! स्पर्धकांची नावही ठरली

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jun 05, 2023 03:23 PM IST

Bigg Boss OTT 2 Latest Update: ‘बिग बॉस ओटीटी २’मध्ये यावेळी स्पर्धकांसाठी ही संकल्पना खूपच वेगळी आणि वेधक असणार आहे. यंदा स्पर्धकांना जंगल थीम असलेल्या घरात राहावे लागणार आहे

Bigg Boss OTT 2
Bigg Boss OTT 2

Bigg Boss OTT 2 Latest Update: रिअॅलिटी शो 'बिग बॉस ओटीटी'च्या दुसऱ्या सीझनबाबत सोशल मीडियावर अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. ‘बिग बॉस ओटीटी’चा सीझन १ करण जोहरने होस्ट केला होता. मात्र, यंदाचा हा सीझन सलमान खान होस्ट करणार आहे. सलमानने बिग बॉसचे अनेक टेलिव्हिजन व्हर्जन होस्ट केले आहेत. आता तो ओटीटी प्लॅटफॉर्मवरही धुमाकूळ घालण्यास सज्ज झाला आहे. आता या सीझनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची नावे देखील समोर आली आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

या दुसऱ्या सीझनसाठी अनुराग डोवालचे नाव निश्चित झाले आहे. आता आणखी एका स्पर्धकाचे नाव समोर आले आहे. ‘बिग बॉस ओटीटी २’च्या अपडेट्स शेअर करत असलेल्या फॅन पेजच्या बातमीनुसार, बिग बॉस ओटीटी २चा प्रोमो पुढील आठवड्यात रिलीज होणार आहे. या शोसाठी आतापर्यंत अनेक नावं समोर आली आहेत, त्यापैकी दोन नावं निश्चित झाली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'स्प्लिट्सविला ७' मध्ये झळकलेली पलक पुरस्वानी लवकरच ‘बिग बॉस ओटीटी २’मध्ये दिसणार आहे. तिच्या नावाची पुष्टी झाली आहे. या सीझनमध्ये आवेज दरबार आणि महेश पुजारी देखील सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे.

Sulochana Latkar Funeral : शेवटच्या प्रवासला निघाल्या प्रेक्षकांच्या लाडक्या सुलोचना दीदी! अंत्यदर्शनासाठी गर्दी

‘बिग बॉस ओटीटी २’मध्ये यावेळी स्पर्धकांसाठी ही संकल्पना खूपच वेगळी आणि वेधक असणार आहे. यंदा स्पर्धकांना जंगल थीम असलेल्या घरात राहावे लागणार आहे. स्पर्धकांना या घरात जगण्यासाठी सर्व्हायव्हल किट देण्यात येणार आहेत. या एका किटमध्ये आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी उपस्थित असतील. शोमधील स्पर्धकांचा प्रवास जंगलापासून सुरू होणार आहे. या ठिकाणी सोफा, लक्झरी बेड नसणार आहे. तर, सुसज्ज बाथरूम आणि स्वयंपाकघर देखील नसणार आहे. स्पर्धकांना त्यांना दिलेल्या सर्व्हायव्हल किटमधून चरितार्थ करावा लागणार आहे.

जो स्पर्धक केवळ सर्व्हायव्हल किटमध्ये उपस्थित असलेल्या वस्तूंसह दिलेले कार्य पूर्ण करण्यास सक्षम असेल, त्यालाच मुख्य घरात प्रवेश मिळेल. यासोबतच या शोमध्ये एक व्हीआयपी रूमही असेल. शोमध्ये अनेक ट्विस्ट आणि टर्न पाहायला मिळणार आहेत. सलमान खानचा ‘बिग बॉस ओटीटी २’ हा शो १७ जूननंतर सुरू होणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग