मराठी बातम्या  /  Entertainment  /  People Attacked On Bigg Boss 16 Actress Dancer Gori Nagori

Gori Nagori: ‘बिग बॉस १६’ फेम अभिनेत्रीला मारहाण; पोलिसांवरही केले गंभीर आरोप

Gori Nagori
Gori Nagori
Harshada Bhirvandekar • HT Marathi
May 26, 2023 08:10 AM IST

Gori Nagori Attacked: 'राजस्थानची शकीरा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून तिची आपबिती सांगितली आहे.

Gori Nagori Attacked:बिग बॉस १६’ फेम गोरी नागौरीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. 'राजस्थानची शकीरा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून तिची आपबिती शेअर केली आहे. २२ मे रोजी बहिणीच्या लग्नासाठी अजमेरमधील किशनगड येथे पोहोचल्यानंतर तिच्यावर कसा हल्ला झाला, यात गोरीने सांगितले आहे. या प्रकरणी तक्रार देण्यासाठी ती पोलिसांत गेली असता, तेथील पोलिसांनी सेल्फी काढून तिला परत घरी पाठवले.

ट्रेंडिंग न्यूज

गोरी नागौरीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ फारसा स्पष्ट दिसत नसला तरी काही लोकांमध्ये जोरदार भांडण झाल्याचे त्यात दिसून येत आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये गोरी नागोरीने लिहिले की, 'नमस्कार मित्रांनो, मी तुमची गोरी आणि आज माझ्यासोबत जे घडले ते कुणासोबत घडू नये, म्हणूनच मी हा व्हिडीओ अपलोड करत आहे. मित्रांनो, माझ्या बहिणीचे लग्न २२ मे रोजी होते. मी मेर्टा सिटीमध्ये राहते आणि मला वडील किंवा भाऊ नाहीत. तर, माझा एक मोठा मेहुणा जावेद आहे, ज्याने सांगितले की हे लग्न किशनगडमध्ये करा, मी सर्व व्यवस्था करीन.’

Dilip Joshi Birthday: कधीकाळी ५० रुपये कमावणाऱ्या दिलीप जोशींना ‘तारक मेहता’ शो मिळाला अन् नशीबच पालटलं! वाचा...

गोरी नागौरीने पुढे लिहिले की, ‘त्यामुळे त्यांच्या सांगण्यावरून मी किशनगडमध्ये लग्न केले आणि मला माहित नव्हते की, हा त्यांचा कट होता. किशनगडला फोन केला आणि माझ्यासह संपूर्ण टीमवर मेव्हण्याने आणि त्याच्या मित्राच्या भावाने खूप वाईट हल्ला केला. यात आम्हाला मारहाण करण्यात आली. यासंदर्भात तक्रार करण्यास मी गेले असता पोलिसांनी माझी तक्रार नोंदवूनच घेतली नाही. या उलट ही घरगुती बाब आहे, घरीच सोडवा असा सल्ला पोलिसांनी दिला. पोलिसांनी मला बराच वेळ बसवून ठेवले आणि माझ्यासोबत सेल्फी काढले. त्यानंतर त्यांनी मला घरी जाण्यास सांगितले.’

गोरी म्हणाली की, ‘मी एकटी मुलगी आहे, मी आणि माझी आई घरात एकट्याच राहतो. माझ्या जीवाला काही बरे वाईट झाले तर? या सगळ्या लोकांपासून आम्हाला धोका आहे.’ गोरा नागौरी हिने राजस्थान सरकारने तिला सुरक्षा देऊन, लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती केली आहे. तसेच, या लोकांपासून तिच्या जीवाला धोका असल्याचा दावाही तिने केला आहे.

WhatsApp channel

विभाग