मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss Marathi 4: वाईल्ड कार्ड स्पर्धक स्नेहलता वसईकर ‘बिग बॉस मराठी’तून आऊट! पोस्ट लिहित म्हणाली...

Bigg Boss Marathi 4: वाईल्ड कार्ड स्पर्धक स्नेहलता वसईकर ‘बिग बॉस मराठी’तून आऊट! पोस्ट लिहित म्हणाली...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 12, 2022 12:23 PM IST

Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस मराठी ४’मधून बाहेर पडल्यानंतर स्नेहलता वसईकर हिने सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांचे आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत.

Snehlata Vasaikar
Snehlata Vasaikar

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठी ४’च्या घरातून या आठवड्यात स्नेहलता वसईकर (Snehlata Vasaikar) या घरातून आऊट झाली आहे. बिग बॉस सीझन ४च्या घरात पहिली वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून स्नेहलता वसईकर हिने एन्ट्री घेतली होती. मात्र, काहीच दिवसांत तिचा हा प्रवास थांबला आहे. ‘बिग बॉस चावडी’च्या भागात स्नेहलता या घरातून बाहेर पडली आहे. या घरातून बाहेर पडल्यानंतर आता स्नेहलताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

‘बिग बॉस मराठी ४’मधून बाहेर पडल्यानंतर स्नेहलता वसईकर हिने सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांचे आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘बिग बॉसचं घर असो किंवा माझा कुठला ही नवा प्रवास, तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवून जे प्रेम सातत्याने करत आहात त्यासाठी मनापासून आभार! 'बिग बॉस'चा प्रवास इथेच संपला असला, तरी नव्या वर्षात नवीन भूमिकेत भेटूच... तुमचं हे प्रेम, खंबीर पाठिंबा कायम राहू द! तुमचीच स्नेहलता’.

‘बिग बॉस मराठी ४’च्या घरात सध्या मोठी धमाल पाहायला मिळत आहे. सध्या या घरात राखी सावंतचा ड्रामा पाहायला मिळत आहे. या आठवड्यात विकास सावंत आणि स्नेहलता वसईकर हे स्पर्धक नॉमिनेशनमध्ये होते. या दोघांमध्ये विकास सावंत हा सेफ झाला. तर, स्नेहलताचा बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवास थांबला. यानंतर स्नेहलता घरातून बाहेर पडली. या घरात अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर आणि स्नेहलता वसईकर यांची चांगली गट्टी जमली होती. या घरातून स्नेहलता बाहेर पडताना अपूर्वा आणि अक्षय यांना रडू कोसळलं होतं. मात्र, या घराबाहेर आपण एकत्र भेटूच असं वाचन एकमेकांना देत स्नेहलताने सगळ्यांचा निरोप घेतला.

य आठवड्यात महेश मांजरेकर यांनी घरातील सदस्यांची शाळा अतिशय सौम्य शब्दात घेतली. नेहमी स्पर्धकांना ओरडून त्यांच्या चुका समजवणारे महेश मांजरेकर यावेळी मात्र शांतपणे न चिडता किंवा न रागवता सगळ्यांनाच त्यांच्या चुका दाखवताना दिसले.

IPL_Entry_Point

विभाग